Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >ॲग्री बिझनेस > धकाधकीच्या जीवनात हा शेतीपूरक व्यवसाय कमवून देईल बक्कळ पैसे; वाचा सविस्तर

धकाधकीच्या जीवनात हा शेतीपूरक व्यवसाय कमवून देईल बक्कळ पैसे; वाचा सविस्तर

This complementary business will earn you a lot of money in a busy life; Read in detail | धकाधकीच्या जीवनात हा शेतीपूरक व्यवसाय कमवून देईल बक्कळ पैसे; वाचा सविस्तर

धकाधकीच्या जीवनात हा शेतीपूरक व्यवसाय कमवून देईल बक्कळ पैसे; वाचा सविस्तर

Krushi Paryatan कृषी पर्यटन केंद्र म्हणजे शेती आणि पर्यटन यांचा सुंदर संगम. हे केंद्र शहरी आणि ग्रामीण पर्यटकांना शेतीशी संबंधित अनुभव प्रदान करते.

Krushi Paryatan कृषी पर्यटन केंद्र म्हणजे शेती आणि पर्यटन यांचा सुंदर संगम. हे केंद्र शहरी आणि ग्रामीण पर्यटकांना शेतीशी संबंधित अनुभव प्रदान करते.

कृषी पर्यटन केंद्र म्हणजे शेती आणि पर्यटन यांचा सुंदर संगम. हे केंद्र शहरी आणि ग्रामीण पर्यटकांना शेतीशी संबंधित अनुभव प्रदान करते.

येथे लोक शेतीच्या पद्धती, पिकांचे प्रकार, जैविक खते आणि पारंपरिक तसेच आधुनिक शेती तंत्रज्ञान जाणून घेऊ शकतात.

पर्यटकांना प्रत्यक्ष शेतात काम करण्याची, शिवार फेरी, फळे-भाज्या स्वतः निवडण्याची आणि ग्रामीण जीवनाचा आनंद घेण्याची संधी मिळते.

यामुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळते आणि ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट होते. तसेच, पर्यटकांना निसर्गाशी जोडले जाणे, ताजे अन्न आणि शांत वातावरणाचा लाभ होतो.

कृषी पर्यटन केंद्रे शाश्वत विकास आणि सांस्कृतिक आदान-प्रदानाला प्रोत्साहन देतात, ज्यामुळे शेती आणि पर्यटन दोन्ही क्षेत्रांना फायदा होतो.

तरुण उद्योजक यामध्ये चांगल्या पद्धतीने शेतीबरोबर पूरक व्यवसाय म्हणून कृषी पर्यटनाला प्राधान्य देत आहे. पुणे विभागामध्ये सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर व पुणे जिल्हा अशी मिळून ३११ कृषी पर्यटन केंद्रे सध्या नोंदणीकृत आहेत.

याव्यतिरिक्त इतरही कृषी पर्यटन केंद्रे सुरू आहेत. त्यांची नोंदणी प्रक्रिया या कार्यालयामार्फत सुरू आहे. आई योजना-महिलांचा पर्यटन क्षेत्रात सहभाग वाढावा, यासाठी योजना राबविण्यात येत आहे.

यामध्ये ४२ प्रकारचा व्यवसाय महिला करू शकतात, ज्यात त्यांना १५ लाखांपर्यंतच्या कर्जावर साडेचार लाखांचा व्याज परतावा पर्यटन विभागामार्फत देण्यात येणार आहे.

पर्यटन क्षेत्रात काम करणाऱ्या व्यावसायिकांसाठी mahabooking.com हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे.

या संकेतस्थळ तयार करण्यामागचा संचालनालयाचा उद्देश सर्व पर्यटन क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्यांसाठी एक व्यासपीठ असावे व पर्यटन क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्यांच्या व्यवसायाला चालना मिळावी.

व्यावसायिकांच्या व्यवसायाची प्रसिद्धी व पर्यटकाला एका व्यासपीठावर सर्व माहिती उपलब्ध व्हावी, हा आहे.

शमा पवार
उपसंचालक, विभागीय पर्यटन कार्यालय, पुणे

Web Title: This complementary business will earn you a lot of money in a busy life; Read in detail