Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >पोल्ट्री > कुक्कुटपालन करायचे ? मग या कोंबडीला निवडा होईल दुप्पट नफा

कुक्कुटपालन करायचे ? मग या कोंबडीला निवडा होईल दुप्पट नफा

Want to start poultry? Then choosing this kombadi will double the profit | कुक्कुटपालन करायचे ? मग या कोंबडीला निवडा होईल दुप्पट नफा

कुक्कुटपालन करायचे ? मग या कोंबडीला निवडा होईल दुप्पट नफा

कुक्कुटपालनातील सर्वात फायद्याची कोंबडी...

कुक्कुटपालनातील सर्वात फायद्याची कोंबडी...

शेअर :

Join us
Join usNext

भारतात कुक्कुट पालनाचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी एक कोंबडी चांगलीच फायदेशीर ठरणारी आहे. या कोंबडीचे पालन केल्यास उत्तम फायदा होण्याची हमी आहे. कुक्कुट पालनाचा व्यवसाय फायदेशीर ठरण्यासाठी जशी बॉयलर कोंबडी उपयोगी ठरते तशी कॅरी निर्भीक (Cari-Nirbheek) नावाच्या जातीची कोंबडी देखील एकदम फायद्याची ठरते.

भारतात अंडी आणि कोंबडी मांसाची मागणी वाढत आहे. त्यामुळे कुक्कुटपालन हा शेतकऱ्यांसाठी उत्तम जोडधंदा ठरत आहे. पोल्ट्री फार्म टाकणे हा कमी भांडवलात मोठी कमाई करण्याचा हा एक चांगला मार्ग आहे. वाढती लोकसंख्या आणि कमी होत असलेला रोजगार यामुळे आजकाल तरुण शेतीबरोबरच आता पशुपालन व्यवसाय जोडधंडा स्वीकारत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

कुक्कुट पालनात अंडी आणि मांस अशा दोन्ही प्रकारचे उत्पन्न मिळते. आणि जागाही फारशी लागत नाही. रोजगाराच्या शोधात असलेले बेरोजगार तरुण आता कुक्कुट पालनाकडे वळले आहेत.

कॅरी निर्भीक कोंबडीचे वैशिष्टये

कोंबड्यांमध्येही अनेक प्रकारच्या जाती आढळतात. ज्या त्यांच्या गुणवत्तेसाठी ओळखले जातात. यापैकी एक कोंबडीची जात आहे ती म्हणजे कॅरी निर्भीक जात होय. या कोंबडीचे मांस उत्तम दर्जाचे असते. आणि अंड्यांच्या पैदास करण्यासाठी ही कोंबडी इतर कोंबड्यापेक्षा वरचढ आहे.

कोंबडीच्या या खास जातीचे पालनपोषण करून कुक्कुटपालन करणारे लघु उद्योजक चांगला नफा कमवू शकतात.

२० आठवड्यांत तयार होते

कॅरी निर्भिक ही कोंबडीची एक देशी जात आहे. जिचे मांस प्रथिने गुणधर्मांनी समृद्ध आहे. ही कोंबडी अतिशय चपळ असते, आकाराने मोठी, ताकदवान, दिसायला देखणी, स्वभावाने लढाऊ आणि मजबूत प्रतिकार शक्तीची असते. सुमारे २० आठवड्यांच्या आतच या कोंबड्यांचे वजन १८०० ग्रॅमपर्यंत पोहोचते. दरवर्षी या कोंबड्या तब्बल १८० ते २०० अंडी देतात. आणि प्रत्येक अंड्यांचे वजन ४०-४५ ग्रॅम असते. 

कॅरी निर्भीक कोंबड्यांचा पोल्ट्री फार्म सुरू करून कमी खर्चात शेतकऱ्यांना दामदुप्पट नफा कमाविता येऊ शकतो असे रायबरेलीतील शिवगढ शासकीय पशुवैद्यकीय रुग्णालयचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. इंद्रजित वर्मा यांनी म्हटले आहे. इंडो – जर्मन यांच्या संयुक्त प्रयत्नातून या कोंबडीची जात साल २००० मध्ये विकसित करण्यात आली होती.

Web Title: Want to start poultry? Then choosing this kombadi will double the profit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.