व्यावसायिक ब्रॉयलर आणि लेयर कोंबडीपालन मोठ्या प्रमाणात वाढत असले वरी आजही विविध शुद्ध देशी तसेच सुधारित देशी कोंबडीपालन देखील किफायतशीर ठरत आहे.
देशी कोंबडीपालन हे ग्रामीण भागात फारच फायदेशीर आणि कमी भांडवलात सुरू करता येणारा व्यवसाय आहे. देशी कोंबड्या कमी देखभालीत, कमी खर्चात आणि नैसर्गिक पद्धतीने वाढतात.
देशी कोंबडीपालनाची वैशिष्ट्ये
◼️ देशी कोंबड्या जास्तीच्या औषधोपचार, पूरक आहाराशिवाय टिकतात.
◼️ उष्णता, थंडी आणि रोग प्रतिकारशक्ती जास्त असल्यामुळे कमी मृत्यूदर.
◼️ अंडी उत्पादन (वर्षभरात १००-१५० अंडी)
◼️ मांस उत्पादन (स्थानिक बाजारात मागणी जास्त)
◼️ शेतातील धान्य, अळ्या, गवत, उरलेले अन्न यावरही सहज वाढतात.
देशी कोंबडीपालनाचे फायदे
◼️ कमी भांडवल, जास्त नफा.
◼️ नैसर्गिक/सेंद्रिय मांस व अंड्यांना बाजारात जास्त दर.
◼️ महिलांसाठी व लघु शेतकऱ्यांसाठी पूरक व्यवसाय.
◼️ बाजारपेठेत कायम मागणी.
प्रशिक्षण कुठे मिळते?
◼️ कुक्कुटपालनाविषयी प्रशिक्षण हे पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र राज्य तसेच महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर मार्फत महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयांत दिले जाते.
◼️ पशुसंवर्धन विभागामार्फत कुक्कुटपालन विषयक प्रशिक्षण देणाऱ्या संस्था मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्र पुणे, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, नागपूर.
◼️ कुक्कुटपालन प्रशिक्षण केंद्र, मुरुड (जि. लातूर), अमरावती, कणकवली (जि. सिंधुदुर्ग)
◼️ महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत विविध पशुवैद्यकीय महाविद्यालया मार्फत कुक्कुटपालन विषयक प्रशिक्षण देणाऱ्या संस्था : मुंबई, नागपूर, परभणी, शिरवळ, अकोला व उदगीर.
अधिक वाचा: सातबाऱ्यावरील इतर हक्कांतील नावे कायदेशीररीत्या कमी करायचीत? कशी कराल? वाचा सविस्तर