कोल्हापूर : जिल्ह्यातील अल्पभूधारक, भूमिहीन शेतमजुरांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक परराज्यातील जातिवंत म्हैस खरेदीसाठी तीन लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध करून देणार आहे.
यासाठी दूध संघ व प्राथमिक दूध संस्थांनी हमी दिल्यानंतर दोन म्हशींसाठी कर्जपुरवठा करण्याचा निर्णय संचालक मंडळाच्या सभेत घेतला.
धवलक्रांती मध्यम मुदत कर्ज योजनेंतर्गत घरठाण पत्रकावर हे कर्ज दिल्यानंतर दोन म्हशींसाठी कर्जपुरवठा करण्याचा निर्णय संचालक मंडळाच्या सभेत घेतला.
धवलक्रांती मध्यम मुदत कर्ज योजनेंतर्गत घरठाण पत्रकावर हे कर्ज वित्त आणि विकास महामंडळ, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ व संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ या माध्यमातून कर्जपुरवठा केला जातो.
संबंधित महामंडळांकडून पशुपालकाला व्याज परतावा मिळतो. अल्पभूधारक व भूमिहीन शेतमजुरांना दोन म्हशी खरेदी करण्यासाठी बँक तीन लाखांपर्यंत अर्थसाहाय्य करेल. त्यासाठी 'गोकुळ' व 'वारणा' दूध संघांसह संबंधित प्राथमिक दूध संस्थांनी हमीपत्र द्यायचे आहे.
काय आहे कर्ज योजना...
◼️ कर्जाचे स्वरूप : एका म्हशीसाठी दीड लाख, तर दोन म्हशींसाठी तीन लाख.
◼️ परतफेडीची मुदत : तीन ते पाच वर्षे.
◼️ हमीपत्र : दूधपुरवठा करत असलेली दूध संस्था व दूध संघ.
◼️ इतर कागदपत्रे : घरठाण उतारा.
◼️ बँकेकडून मिळणारे अनुदान : दहा हजार रुपये.
अधिक वाचा: आंतरराष्ट्रीय बाजारात गाईच्या शेणाला प्रचंड मागणी; भारतातून कोणत्या देशात किती शेण होतंय निर्यात?
