नाशिक : नाशिक सहकारी साखर कारखान्याचा सन २०२५-२६ गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ दसऱ्याच्या मुहूर्तावर ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हस्ते विधिवत पूजन करून झाला. या हंगामासाठी कारखान्याने २ लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे.
नाशिक सहकारी साखर कारखाना गेल्या तीन हंगामापासून अष्टलक्ष्मी शुगर इथेनॉल ॲण्ड एनर्जी कंपनीच्या माध्यमातून चालविला जात आहे. २०२५-२६ या गळीत हंगामासाठी कारखाना प्रशासनाने सर्वोतोपरी तयारी केलेली असून २ लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट निश्चित केलेले आहे.
दसऱ्याच्या मुहूर्तावर ऊस उत्पादक शेतकरी सुदाम टिळे, किशोर जगताप यांनी सहपत्नी बॉयलरची विधिवत पूजा करून अग्निप्रदीपन अध्यक्षस्थानी माजी खासदार हेमंत गोडसे होते.
