Lokmat Agro >ॲग्री बिझनेस > Cow Day : गोमातेचा सन्मान : आता प्रत्येक वर्षी २२ जुलैला गायींसाठी विशेष दिन वाचा सविस्तर

Cow Day : गोमातेचा सन्मान : आता प्रत्येक वर्षी २२ जुलैला गायींसाठी विशेष दिन वाचा सविस्तर

latest news Cow Day : Honoring the cow: Now every year on July 22nd, a special day for cows. Read in detail | Cow Day : गोमातेचा सन्मान : आता प्रत्येक वर्षी २२ जुलैला गायींसाठी विशेष दिन वाचा सविस्तर

Cow Day : गोमातेचा सन्मान : आता प्रत्येक वर्षी २२ जुलैला गायींसाठी विशेष दिन वाचा सविस्तर

Cow Day : राज्यातील गोमाता आणि देशी गोवंशाच्या जतनासाठी आता सरकार पावले उचलत आहे. २२ जुलै रोजी 'शुद्ध देशी गोवंश जतन व संवर्धन दिन' साजरा केला जाणार असून, देशी गायींच्या उपयोगिता व आरोग्यदायी लाभांविषयी माहिती देणारे उपक्रम घेतले जातील.

Cow Day : राज्यातील गोमाता आणि देशी गोवंशाच्या जतनासाठी आता सरकार पावले उचलत आहे. २२ जुलै रोजी 'शुद्ध देशी गोवंश जतन व संवर्धन दिन' साजरा केला जाणार असून, देशी गायींच्या उपयोगिता व आरोग्यदायी लाभांविषयी माहिती देणारे उपक्रम घेतले जातील.

शेअर :

Join us
Join usNext

Cow Day : राज्यातील गोमाता आणि देशी गोवंशाच्या जतनासाठी आता सरकार पावले उचलत आहे. २२ जुलै रोजी 'शुद्ध देशी गोवंश जतन व संवर्धन दिन' साजरा केला जाणार असून, देशी गायींच्या उपयोगिता व आरोग्यदायी लाभांविषयी माहिती देणारे उपक्रम घेतले जातील. (Cow Day)

देशी गायींची घटती संख्या, उत्पादन व प्रजनन क्षमतेतील मर्यादा यावर उपाय म्हणून महाराष्ट्र शासनाने मोठे पाऊल उचलले आहे. (Cow Day)

दरवर्षी २२ जुलै हा दिवस 'शुद्ध देशी गोवंश जतन व संवर्धन दिन' म्हणून साजरा करण्यात येणार असल्याची अधिकृत घोषणा नुकतीच शासन निर्णयाद्वारे करण्यात आली आहे.(Cow Day)

या दिवशी देशी गायींचे महत्त्व, त्यांच्यापासून मिळणाऱ्या दुग्धजन्य व इतर उत्पादनांचे उपयोग यावर प्रकाश टाकणाऱ्या विविध उपक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. यामध्ये चर्चासत्रे, प्रदर्शने, जनजागृती शिबिरे, तसेच स्पर्धा आयोजित केल्या जातील. (Cow Day)

देशी गोवंशाचे महत्त्व

देशी गायीच्या दूध, शेण व गोमूत्राच्या उपयुक्ततेमुळे तिला 'कामधेनु' असे गौरविले जाते. राज्यातील विविध भागांत वेगवेगळ्या देशी गायींच्या जाती आढळतात.

पशुसंवर्धन व महाराष्ट्र गोसेवा आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने हे उपक्रम राबवले जातील. देशी गोवंशाचे संवर्धन, उत्पादनक्षमता वाढविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि देशी गायींच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे या दिशेनेही प्रयत्न केले जाणार आहेत.

या उपक्रमासाठी आवश्यक निधी महाराष्ट्र गोसेवा आयोगामार्फत उपलब्ध करून दिला जाणार आहे. देशी गायींच्या संवर्धनासाठीचा हा निर्णय एक सकारात्मक पाऊल मानले जात आहे.

देशी गोवंशाचे रक्षण व संवर्धन ही काळाची गरज आहे. शासनाच्या या निर्णयामुळे गायींच्या संगोपनाला नवी दिशा मिळणार असून ग्रामीण अर्थव्यवस्थेला हातभार लागेल. यामुळे जैविक शेती, दुग्धोत्पादन व पर्यावरण रक्षणालाही चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

हे ही वाचा सविस्तर : Pdkv Cow : अकोल्यात सेक्स-सॉर्टेड सिमेनचा यशस्वी प्रयोग; पाहा काय आहे विशेष वाचा सविस्तर

Web Title: latest news Cow Day : Honoring the cow: Now every year on July 22nd, a special day for cows. Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.