गडचिरोली :गडचिरोली जिल्ह्यातील (Gadchiroli District) कुरखेडा तालुक्यातील खरकाडा या गावातील किशोर जौजारकर नामक पशुपालकाच्या घरी एका साहिवाल गायीने दोन जुळ्या वासरांना जन्म दिला आहे. साहिवाल गायीला सिद्ध वळूपासून संकलित केलेले साहिवाल जातीची विर्यकांडीपासून कृत्रिम गर्भधान केले होते.
तालुका लघु पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय कुरखेडाचे प्रभारी सहायक आयुक्त डॉ. देवेंद्र मेश्राम यांच्या मार्गदर्शनात पूर्णानंद नेवारे यांनी दुग्धोत्पादक शेतकऱ्याच्या साहिवाल गायीला (Sahiwal Cow) सिद्ध वळूपासून संकलित केलेले साहिवाल जातीची विर्यकांडीपासून कृत्रिम गर्भधान केले होते. आणि ९ महिन्यानंतर गायीने दोन साहिवाल कालवडीला जन्म दिला. त्यामुळे पशुपालकांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
दूध उत्पादनात (Milk Production) आपला देश जागतिक स्तरावर अव्वल क्रमांकावर असून २०२३-२०२४ मध्ये वार्षिक दुधाचे उत्पादन २३९.३० दशलक्ष टन झाले आहे तर दरडोई दुधाची उपलब्धता ही ४७१ ग्राम प्रतिदिन झाली आहे. आपल्या देशातील बहुतांश गायी गावठी आहेत तसेच त्यांची सरासरी एका वेतातील उत्पादकता, पाश्चात देशातील गायींपेक्षा फारच कमी आहे.
पशुसंवर्धन विभागाने माजावर आलेल्या गायी- म्हशीमध्ये कृत्रिम रेतन करण्याचे धोरण निश्चित केले आहे. कृत्रिम रेतन म्हणजे कुशल व्यक्तीकडून उच्च वंशावळीच्या वळूचे वीर्य कृत्रिम योनिमार्फत संकलित करून, आहे त्या स्थितीत किंवा त्याची मात्रा वाढवून नियमित माजावर आलेल्या मादीच्या प्रजनन संस्थेत योग्य वेळी व योग्य ठिकाणी विशेष साधनाद्वारे सोडणे होय. ही प्रक्रिया केल्यानंतर गायीला गर्भधारणा होत असते.
कृत्रिम रेतनाचे फायदे
- गोठ्यात नर किंवा वळू सांभाळण्याची गरज नाही तसेच वळूवरचा खर्च कमी करता येतो.
- वळूच्या नैसर्गिक संपकीमुळे, गायींना होणारे लैंगिक आजार टाळू शकतो.
- उदा. विब्रिओसिस आजार, संसर्गजन्य गर्भपात.
- कृत्रिम रेतनापासून जन्मलेल्या पिढ्यांच्या दूध उत्पादनात भरीव वाढ जास्त वय झालेले, अधू तसेच जखमी सिद्ध वळूचा वापर करू शकतो.
- देशी जातिवंत पशूचे संवर्धन व जतन करणे शक्य आहे. नैसर्गिक प्रजननात एक वळू एका वर्षात ५०- ६० गायी गर्भार राहू शकतात.
- या उलट कृत्रिम रेतनाने एकाच वळूपासून दरवर्षी हजारो गायी गर्भार राहू शकतात.