Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >ॲग्री बिझनेस > बाजार दरांपुढे पपई फळबागेतून उत्पन्न कमी मिळतंय? मग प्रक्रिया उद्योगातून मिळवा अधिक नफा

बाजार दरांपुढे पपई फळबागेतून उत्पन्न कमी मिळतंय? मग प्रक्रिया उद्योगातून मिळवा अधिक नफा

Is the income from papaya orchards less than the market price? Then get more profit from the processing industry | बाजार दरांपुढे पपई फळबागेतून उत्पन्न कमी मिळतंय? मग प्रक्रिया उद्योगातून मिळवा अधिक नफा

बाजार दरांपुढे पपई फळबागेतून उत्पन्न कमी मिळतंय? मग प्रक्रिया उद्योगातून मिळवा अधिक नफा

Papaya Processing : पपई फळाला अपेक्षित दर मिळत नाही. परिणामी शेतकऱ्यांची मोठी आर्थिक हानी होत असते. ज्यामुळे आपण विविध उत्पादनाच्या माध्यमातून पपईचे मूल्यवर्धन करून त्याद्वारे अधिक प्रमाणात नफा वाढवू शकतो. 

Papaya Processing : पपई फळाला अपेक्षित दर मिळत नाही. परिणामी शेतकऱ्यांची मोठी आर्थिक हानी होत असते. ज्यामुळे आपण विविध उत्पादनाच्या माध्यमातून पपईचे मूल्यवर्धन करून त्याद्वारे अधिक प्रमाणात नफा वाढवू शकतो. 

आपल्याकडे राज्यातील जळगाव, अहिल्यानगर, पुणे, धुळे, नाशिक इ. जिल्ह्यात पपईची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. पपई मध्ये अनेक आरोग्यवर्धक गुणधर्म असल्याने वर्षभर पपईला सर्वाधिक मागणी असते.

मात्र वर्षभर पपई फळाला अपेक्षित दर मिळत नाही. परिणामी शेतकऱ्यांची मोठी आर्थिक हानी होत असते. ज्यामुळे आपण विविध उत्पादनाच्या माध्यमातून पपईचे मूल्यवर्धन करून त्याद्वारे अधिक प्रमाणात नफा वाढवू शकतो. 

तसेच या पपई प्रक्रियाद्वारे एक उद्योग देखील उभा राहू शकतो. ज्यातून शेतकरी पुत्र स्वालंबी होऊन आर्थिक संपन्न वाटचाल करू शकतात. चला तर जाणून घेऊया पपईच्या विविध उत्पादनाची सविस्तर माहिती.  

पपईचा स्क्रॅश

साहित्य : पपईचा गर १ किलो, साखर २ किलो, पाणी १ लिटर, सायट्रिक ॲसिड २५ ग्रॅम.

कृती : चांगली पिकलेली पपई निवडा, पपई स्वच्छ धुऊन चाकूने तुकडे करा. बिया काढून टाका आणि साल काढून टाका. पपईचे तुकडे मिक्सरमध्ये मिक्स करून पल्प तयार करा. पातेल्यात साखर आणि पाणी टाकून मंद आचेवर साखरेचा पाक तयार करा. पाक तयार झाल्यावर, सायट्रिक ॲसिड टाका आणि गाळून घेतल्यावर पपईच्या पल्पमध्ये मिसळा. बाटल्या निर्जंतुक करा आणि स्क्रॅश भरून हवाबंद करा.

पपईचा जॅम

साहित्य : पपई (न पिकलेली) १ किलो, साखर १ किलो, सायट्रिक ॲसिड ५ ग्रॅम.

कृती : कच्च्या पपईची साल आणि बिया काढून बारीक तुकडे करा. तुकड्यांमध्ये थोडे सायट्रिक ॲसिड आणि पाणी घालून शिजवून मऊ करा. मिक्सरमध्ये घालून पपईचा गर बनवा. गर मध्ये साखर आणि सायट्रिक ॲसिड टाकून मंद आचेवर घट्ट होईपर्यंत शिजवा. जॅम तयार झाला की, त्याला निर्जंतुक बाटलीमध्ये भरून ठेवा.

पपईची टूटीफ्रुटी

साहित्य : कच्ची पपई १ किलो, साखर ३/४ किलो, सायट्रिक ॲसिड १० ग्रॅम, कृत्रिम रंग (गरजेनुसार).

कृती : पपई स्वच्छ धुऊन, साल काढून बारीक तुकडे करा. तुकड्यांमध्ये २% मीठाचे पाणी आणि १% कॅल्शिअम क्लोराईड टाका आणि ३० मिनिटे ठेवा. नंतर साखर, रंग, आणि सायट्रिक ॲसिड घालून गॅसवर ५ मिनिटे गरम करा. मिश्रण ४ तास खोलीच्या तापमानावर ठेवा आणि नंतर वाळवून टूटीफ्रुटी तयार करा.

पपईचे रेडी टू सर्व्ह (आर.टी.एस.)

साहित्य : पपई पल्प २ लिटर, साखर १ किलो, सायट्रिक आम्ल, पोटॅशिअम मेटाबायसल्फाईट.

कृती : पपईचे तुकडे करून मिक्सरमध्ये पल्प तयार करा. साखर पाणी घालून मंद आचेवर पाक तयार करा. सायट्रिक आम्ल टाकून, साखरेचा पाक थंड झाल्यावर, त्यात पपईचा पल्प मिसळा. पोटॅशिअम मेटाबायसल्फाईट टाका, आणि ८०°C तापमानावर गरम करा. बाटल्यांमध्ये भरून सील करा आणि पाश्चरायझेशन करून थंड करा.

पपईचे लोणचं

साहित्य : पपई १ किलो, मीठ १०० ग्रॅम, लाल मिरची पुड १० ग्रॅम, व्हिनेगर ७५० मिली.

कृती : कच्ची पपई स्वच्छ धुऊन, तुकडे करा आणि मऊ होण्यासाठी उकळून घ्या. तुकड्यांमध्ये मीठ घालून उन्हात ठेवा. लाल मिरची, जीरे, वेलची एकत्र करून पपईच्या तुकड्यात मिसळा. व्हिनेगर टाकून बरणीत ठेवा. एक आठवडा नंतर लोणचं तयार होईल.

वरील विविध पपई उत्पादने आपण आकर्षक पॅकिंग करून बाजारात विक्री करू शकतात. तसेच या उद्योगासाठी कृषि विभागात काही योजना देखील कार्यान्वित असतात. तेव्हा अधिक माहितीसाठी कृषि विभागाशी संपर्क केल्यास निश्चित फायदा होईल. 

हेही वाचा : तूर शेती ठरतेय शेतकऱ्यांना फायद्याची; पारंपरिक पिकांना फाटा देत तयार होतंय तूर हब

Web Title : पपीता प्रसंस्करण से मुनाफा: किसानों के लिए मूल्य संवर्धन विचार

Web Summary : पपीता खेती को बाजार मूल्य चुनौतियों का सामना करना पड़ता है। किसान पपीता को स्क्वैश, जैम, टूटी-फ्रूटी, आरटीएस पेय और अचार जैसे उत्पादों में संसाधित करके आय बढ़ा सकते हैं। ये मूल्य वर्धित उत्पाद स्वरोजगार और वित्तीय स्थिरता के अवसर पैदा करते हैं।

Web Title : Process Papaya for Profit: Value Addition Ideas for Farmers

Web Summary : Papaya farming faces market price challenges. Farmers can boost income by processing papaya into products like squash, jam, tooty-fruity, RTS drinks, and pickles. These value-added products create opportunities for self-employment and financial stability, offering a profitable alternative to selling raw fruit.