Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >मासे पालन > Fishing मासेमारी बंदी काळात मच्छीमार कशी करतात मासेमारी

Fishing मासेमारी बंदी काळात मच्छीमार कशी करतात मासेमारी

Rapan Method How fishermen do fishing during fishing ban | Fishing मासेमारी बंदी काळात मच्छीमार कशी करतात मासेमारी

Fishing मासेमारी बंदी काळात मच्छीमार कशी करतात मासेमारी

कोळीबांधव रोज पहाटे ४:०० वाजता समुद्राच्या भरतीवेळी उसळलेल्या लाटांमध्ये मोठी लांब जाळी खांद्यावर घेऊन जातात. एक जाळे पकडण्यासाठी २० ते ३० जण तरुण लागतात. दुपारपर्यंत रापण करीत मासेमारी करतात.

कोळीबांधव रोज पहाटे ४:०० वाजता समुद्राच्या भरतीवेळी उसळलेल्या लाटांमध्ये मोठी लांब जाळी खांद्यावर घेऊन जातात. एक जाळे पकडण्यासाठी २० ते ३० जण तरुण लागतात. दुपारपर्यंत रापण करीत मासेमारी करतात.

शेअर :

Join us
Join usNext

दोन महिन्याच्या बंदीमुळे मासेमारी बोटी किनाऱ्यावर लागल्या आहेत. या काळात मच्छीमार बांधव किनाऱ्यावर रापणद्वारे मासेमारी करीत आपला उदरनिर्वाह करतात. याद्वारे आता मासेमारी सुरू आहे.

मुरुड एकदरा परिसरात १०३ मच्छिमार बोटी व छोट्या बोटी ३० ते ४० आहेत. बंदीवगळता या बोटी खोल समुद्रात जात मासेमारी करतात. मात्र, यंदाचा हंगाम त्यांना चांगला गेला नाही, सतत झालेल्या हवामान बदलामुळे तसेच एलईडी मासेमारी व जेलीफीशचे आक्रमण यामुळे वारंवार अडथळे आले.

त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची झाली आहे. त्यामुळे बंदी काळात उदरनिर्वाह करायचा कसा, असा प्रश्न अनेकांसमोर आहे. त्यामुळे सध्या समुद्र किनाऱ्यावर रापण पद्धतीने ते मासेमारी करीत आहेत.

कोळीबांधव रोज पहाटे ४:०० वाजता समुद्राच्या भरतीवेळी उसळलेल्या लाटांमध्ये मोठी लांब जाळी खांद्यावर घेऊन जातात. एक जाळे पकडण्यासाठी २० ते ३० जण तरुण लागतात. दुपारपर्यंत रापण करीत मासेमारी करतात, मिळालेले मासे विकून आपला वाटा घेऊन घरी येतात, असा त्याचा सध्या दिनक्रम सुरू आहे.

ज्यांना हे मेहनतीचे काम जमत नाही ते मच्छीमार बांधव इतर कामे करीत आहेत. यात गवंडी काम किंवा रंगकाम करीत आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत. 

अशी करतात मासेमारी
• रापणीचे जाळे फारच मोठे असते. ते पाण्याचा मोठा भाग व्यापते. त्या जाळ्याला दोन्ही बाजूंना ५० ते ६० वाव जाड काथ्याचा दोरखंड, ५० ते ६० पाटे जोडून, १५ फूट उंची राखली जाते. जाळे जड शिशामुळे तळाला जाऊन उभे राहते. त्यामुळे मासे जाळ्याच्या बाहेर जाऊ शकत नाहीत.
• जाळ्याच्या तरंगाची पूर्ण माळ कमी पाण्यात दिसत असते. पुढे मार्ग काढत जाळे टाकले जाते. उसळत्या लाटांमध्ये किनाऱ्यावर येतो. रापण ओढण्याकरिता ८ ते ९ जण लागतात. हा दोरखंड मातीत/वाळूत खोलवर पाय रोवून ओढला जातो. हे खूप मेहनतीचे काम असते.
• एक जाळे पकडण्यासाठी २० ते ३० जण तरुण लागतात. दुपारपर्यंत रापण करीत मासेमारी करतात.

रापण मासेमारी करताना जाळ्यात मासे कमी आणि समुद्रातील कचरा. ऑईल जास्त येत आहे. त्यामुळे जाळी तुटत असून, नुकसान होत आहे. शासनाने कोळी मच्छीमार बांधवांसाठी विशेष पॅकेजची तरतूद करावी. - प्रकाश सरपाटील, माजी चेअरमन, जय भवानी मच्छीमार सोसायटी

अधिक वाचा: Traditional Fishing आता खाडीकिनारी पारंपरिक मच्छिमारी सुरू होणार

Web Title: Rapan Method How fishermen do fishing during fishing ban

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.