Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >मासे पालन > ऑगस्टच्या 'या' तारखेपासून मासेमारीला होणार सुरवात; बोटींच्या दुरुस्तीसाठी लगबग

ऑगस्टच्या 'या' तारखेपासून मासेमारीला होणार सुरवात; बोटींच्या दुरुस्तीसाठी लगबग

Fishing will start from 'this' date in August; Boats to be repaired soon | ऑगस्टच्या 'या' तारखेपासून मासेमारीला होणार सुरवात; बोटींच्या दुरुस्तीसाठी लगबग

ऑगस्टच्या 'या' तारखेपासून मासेमारीला होणार सुरवात; बोटींच्या दुरुस्तीसाठी लगबग

Masemari 2025 Season खोल समुद्रातील मासेमारीसाठी मच्छीमारांना ५० ते ७० वाव खोल समुद्रात जावे लागते. त्यासाठी एका ट्रिपसाठी १० ते १२ दिवस खर्ची घालावे लागतात.

Masemari 2025 Season खोल समुद्रातील मासेमारीसाठी मच्छीमारांना ५० ते ७० वाव खोल समुद्रात जावे लागते. त्यासाठी एका ट्रिपसाठी १० ते १२ दिवस खर्ची घालावे लागतात.

शेअर :

Join us
Join usNext

एक जूनपासूनच्या मासेमारी बंदीनंतर १ ऑगस्टपासून खोल समुद्रातील पावसाळी मासेमारीला सुरुवात होणार आहे.

मात्र, २० दिवसांचा कालावधी शिल्लक असतानाही मच्छीमारांची बोटी दुरुस्ती व तयारीसाठी आतापासूनच लगबग सुरू झाली आहे. यामुळे करंजा, मोरा, कसारा, ससून डॉक बंदरात हजारो मच्छीमारांची गर्दी दिसत आहे.

खोल समुद्रातील मासेमारीसाठी मच्छीमारांना ५० ते ७० वाव खोल समुद्रात जावे लागते. त्यासाठी एका ट्रिपसाठी १० ते १२ दिवस खर्ची घालावे लागतात.

मासेमारीच्या एक ट्रिपसाठी दीड ते दोन लाखांपर्यंत खर्च येतो. समुद्राच्या तळाशी असलेली सर्वच प्रकारची मासळी या पद्धतीत पकडली जाते.

चांगल्या प्रतीची निर्यात करण्यायोगी मासळी खोल समुद्रात मिळत असल्याने ती करणाऱ्या मच्छीमारांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे ५० ते ७० वाव खोल समुद्रातील मासेमारीसाठी २० दिवस आधीपासून तयारी सुरू झाली आहे.

बोटींच्या डागडुजी, रंगरंगोटी, जाळींची दुरुस्ती, इंजिन आणि इतर तत्सम कामे करण्यासाठी मच्छीमारांची लगबग सुरू झाली आहे.

डिझेलचा कोटा वेळेत मिळावा
◼️ पावसाळी ६१ दिवसांच्या मासेमारी बंदी नंतर एक ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या मासेमारीसाठी मच्छीमार आसुसलेले आहेत.
◼️ यासाठी मच्छीमारांना शासनाकडून मिळणारा डिझेलचा कोटा वेळेतच उपलब्ध होणे आवश्यक आहे.
◼️ यासाठी आतापासूनच बैठका घेऊन निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. मात्र, शासनाकडून वेळेत डिझेल कोटा मिळाला नाही.
◼️ तरी बाहेरून मिळणारे महागडे डिझेल खरेदी करून १ ऑगस्टपासून मासेमारीसाठी निघण्याची तयारीही उरण तालुक्यातील मच्छीमारांची असल्याची माहिती करंजा मच्छीमार संस्थेचे माजी उपाध्यक्ष तथा व्यावसायिक रमेश नाखवा यांनी दिली.

अधिक वाचा: चंदगड तालुक्यात शेतकऱ्याला सापडला तब्बल २८ किलोचा कटला प्रजातीचा मासा

Web Title: Fishing will start from 'this' date in August; Boats to be repaired soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.