Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >मासे पालन > मच्छिमारांना बर्फ पुरवठा बंद करण्याचा निर्णय मागे; टनामागे किती रुपयांनी केली दरवाढ?

मच्छिमारांना बर्फ पुरवठा बंद करण्याचा निर्णय मागे; टनामागे किती रुपयांनी केली दरवाढ?

Decision to stop supply of ice to fishermen reversed; How many rupees per ton did the price increase? | मच्छिमारांना बर्फ पुरवठा बंद करण्याचा निर्णय मागे; टनामागे किती रुपयांनी केली दरवाढ?

मच्छिमारांना बर्फ पुरवठा बंद करण्याचा निर्णय मागे; टनामागे किती रुपयांनी केली दरवाढ?

बर्फ पुरवठा बंद करण्याचा निर्णय मागे घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे हजारो मच्छीमार, बर्फ वितरकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

बर्फ पुरवठा बंद करण्याचा निर्णय मागे घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे हजारो मच्छीमार, बर्फ वितरकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

ऑल इंडिया आईस मॅन्युफॅक्चर असोसिएशन आणि विविध मच्छीमार संस्थांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत तीन तास चाललेल्या चर्चेअंती मच्छीमारांना पुरवठा करणाऱ्या बर्फाच्या दरात टनामागे ८५ ऐवजी ६५ रुपये वाढीला मान्यता दिली.

बर्फ पुरवठा बंद करण्याचा निर्णय मागे घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे हजारो मच्छीमार, बर्फ वितरकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. मच्छीमारांसाठी व्यापाऱ्यांनी बर्फाच्या दरात टनामागे ८० रुपयांची वाढ केल्याने बर्फ २३०० रुपये प्रतिटनाने मिळत होता.

त्यानंतर दीड महिन्यातच वीज दरवाढीचे कारण पुढे करीत ऑल इंडिया आईस मॅन्युफॅक्चर असोसिएशनचे पुन्हा आणखी प्रतिटन ८५ रुपयांची वाढ करण्याची मागणी केली होती.

बर्फाच्या दरवाढीवर १६ सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीत दरवाढीला मच्छीमार संस्थांनी विरोध केला होता. दरवाढ मान्य न केल्यास बर्फ पुरवठा बंद होणार होता. 

मात्र, ऑल इंडिया आईस मॅन्युफॅक्चर असोसिएशनने विविध मच्छीमार संस्थांच्या प्रतिनिधींनी केलेला विरोध झुगारून २० सप्टेंबरपर्यंत दरवाढीचा प्रस्ताव मान्य न केल्यास बर्फ पुरवठा बंद करण्याचा इशारा दिला होता.

१ ऑक्टोबरपासून दर होणार लागू
◼️ दरवाढीच्या निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी करतानाच मासळी व्यवसायावर अवलंबून असलेल्या महत्त्वाच्या प्रश्नावर दोन दिवसांत पुन्हा तातडीने बैठक बोलावण्याची विनंती करंजा मच्छीमार संस्थेचे अध्यक्ष प्रदीप नाखवा यांनी केली होती.
◼️ शुक्रवारी वाशी येथील मर्चंट जिमखाना येथे आयोजित बैठकीत मच्छीमार संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
◼️ यावेळी ऑल इंडिया आईस मॅन्युफॅक्चर असोसिएशन बर्फाच्या दरात ८५ रुपये वाढ करण्याच्या प्रस्तावावर ठाम होती.
◼️ प्रदीर्घ चर्चेनंतर ६५ रुपये वाढीच्या प्रस्तावास मान्यता दिली असून, ही दरवाढ एक ऑक्टोबरपासून लागू होणार आहे.

अधिक वाचा: महाडीबीटी वरील शेतीच्या सर्व योजना दिसणार आता तुमच्या मोबाईलवर; डाउनलोड करा 'हे' मोबाईल अ‍ॅप

Web Title: Decision to stop supply of ice to fishermen reversed; How many rupees per ton did the price increase?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.