Join us

चंदगड तालुक्यात शेतकऱ्याला सापडला तब्बल २८ किलोचा कटला प्रजातीचा मासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 13:31 IST

katala masa राकसकोप-तुडये धरणाच्या पाणलोट क्षेत्राजवळील मळवी येथील एका शेतकऱ्याला तब्बल २८ किलो वजनाचा कटला मासा मिळाल्याने परिसरात आश्चर्य व्यक्त होत आहे.

चंदगड : राकसकोप-तुडये धरणाच्या पाणलोट क्षेत्राजवळील मळवी येथील एका शेतकऱ्याला तब्बल २८ किलो वजनाचा कटला मासा मिळाल्याने परिसरात आश्चर्य व्यक्त होत आहे.

ऐन पावसाळ्यात राकसकोप आणि तिलारी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मासेमारी करणाऱ्यांसाठी हा एक दुर्मीळ योग ठरला आहे.

इतक्या मोठ्या वजनाचा मासा मिळणे अत्यंत दुर्मीळ मानले जाते. चुकूनच असा मोठा मासा जाळ्यात सापडतो, त्यामुळे हा एक विशेष प्रसंग ठरला आहे.

या भागामध्ये मासेमारी मोठ्या प्रमाणात केली जाते. कटला आणि नवरंग माशाला तर नेहमीच मोठी मागणी असते.

सीमा भागातील अनेक लोक मासेमारीसाठी तुडये आणि हाजगोळी या ठिकाणी येतात. २८ किलो वजनाचा कटला मासा मिळाल्याने परिसरात आश्चर्य व्यक्त होत आहे.

अधिक वाचा: तुकडेबंदी कायद्या संदर्भात महसूल मंत्र्यांची मोठी घोषणा; कुणाला होणार फायदा? जाणून घ्या सविस्तर

टॅग्स :शेतकरीधरणपाणीमच्छीमारकोल्हापूर