lokmat Supervote 2024
Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >डेअरी > Viral Video: या पशुपालकाने वासरीसाठी केला चक्क अन्नप्राशन सभारंभ, कार्यक्रमात केलं असं काही…

Viral Video: या पशुपालकाने वासरीसाठी केला चक्क अन्नप्राशन सभारंभ, कार्यक्रमात केलं असं काही…

this dairy farmer celebrates Annaprashan ceremony for his calf | Viral Video: या पशुपालकाने वासरीसाठी केला चक्क अन्नप्राशन सभारंभ, कार्यक्रमात केलं असं काही…

Viral Video: या पशुपालकाने वासरीसाठी केला चक्क अन्नप्राशन सभारंभ, कार्यक्रमात केलं असं काही…

लहान मुलाप्रमाणेच या पशुपालकाने आपल्या वासरासाठी अन्नप्राशन समारंभ थाटात साजरा केला.

लहान मुलाप्रमाणेच या पशुपालकाने आपल्या वासरासाठी अन्नप्राशन समारंभ थाटात साजरा केला.

शेअर :

Join us
Join usNext

जन्माला आलेल्या बाळासाठी काही महिने तरी आईचे दूध हाच उत्तम आहार असतो. त्यानंतर बाळ जेव्हा साधारण सहा महिन्याचे होते, तेव्हा त्याला आईच्या दुधाव्यतिरिक्त वरचे हलके अन्न देण्यास सुरूवात केली जाते. अनेक ठिकाणी बाळाला पहिल्यांना अन्न भरविण्याचा ‘अन्नप्राशन’ समारंभ केला जातो. आपल्या जनावरांवर लहान मुलांप्रमाणेच प्रेम करणारे जे शेतकरी, पशुपालक असतात, तेही आपल्या गाई-बैलांसाठी सभारंभ करत असतात.

अशाच एका पशुपालकाने आपल्या वासरीसाठी अन्नप्राशन सभारंभ साजरा केला. त्यासाठी त्याने मोठा थाटमाट केलाच, शिवाय अनेक खाद्यपदार्थही व्यवस्थित सजवून वासरीपुढे ठेवण्यात आले होते. त्या वासरीला किशोरी असे नाव आहे.

बोलक्या डोळ्यांची ही वासरी अत्यंत गोंडस दिसते. सर्वप्रथम तिचे औक्षण करून नंतर दिला धान्य भरवले जाते. याशिवाय तिच्या पुढ्यात सजवलेल्या वाट्यांमध्ये विविध मिठाईही ठेवण्यात आली आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ सध्या चर्चेत आहे. काऊलव्हर या अकाऊंटवरून तो शेअर करण्यात आला असून त्यातील व्यक्तींच्या पेहरावावरून तो उत्तरेकडील राज्यांतील असावा असा अंदाज आहे.

 

View this post on Instagram

A post shared by gouvedik product (@gopalak_jay_gouvedik_product)

महाराष्ट्रातही अनेक पशुपालक शेतकरी गाई-बैलांचे लाड करताना दिसत असतात. कुणी त्यांचे वाढदिवस साजरे करतात, तर कुणी गाईच्या डोहाळेजेवणाचाही कार्यक्रम करताना दिसतात.

Web Title: this dairy farmer celebrates Annaprashan ceremony for his calf

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.