नवनाथ जगदाळेदहिवडी : जगातील सर्वात बुटकी पाळीव म्हैस म्हणून सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील मलवडीच्या 'राधा'ची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.
या ठेंगण्या 'राधा'ला पाहण्याची सर्वांनाच उत्सुकता लागली असून, प्रत्येक प्रदर्शनात ती आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. मलवडीतील शेतकरी व पशुपालक त्रिंबक बोराटे यांच्या घरच्याच म्हशीच्या पोटी १९ जून २०२२ रोजी 'राधा'चा जन्म झाला.
ती दोन-अडीच वर्षांची झाल्यावर तिच्या उंचीतील बदल त्रिंबक बोराटे यांच्या लक्षात आला. त्यानंतर बोराटे यांचा कृषी पदवीधर मुलगा अनिकेत याने राधाला कृषी प्रदर्शनात सहभागी करण्याचा निर्णय घेतला. मात्र सुरुवातीला कोणीच त्याला प्रतिसाद दिला नाही.
२१ डिसेंबर २०२४ सोलापूर येथील सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनात राधाने सहभाग घेतला अन् तिथूनच तिचा सर्वत्र बोलबाला सुरू झाला. त्यानंतर पुसेगाव, कर्नाटकातील निपाणी यांसह १३ कृषी प्रदर्शनात खास आकर्षण म्हणून 'राधा'ला निमंत्रित करण्यात आले.
२४ जानेवारी २०२५ रोजी राधाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद झाली. परभणी येथील कृषी प्रदर्शनानंतर अनिकेत याने राधाच्या गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसाठी प्रयत्न सुरू केले.
यात पशुधन विकास अधिकारी डॉ. शरद थोरात यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांनी १२ सप्टेंबर २०२५ ला राधाची पाहणी करून अहवाल पाठवला.
२० सप्टेंबरला कागदपत्रे सादर केली व शेवटी २८ ऑक्टोबर रोजी राधाची जगातील सर्वात बुटकी म्हैस म्हणून 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये नोंद झाली. तिची उंची २ फूट ८ इंच तर वजन २८५ किलो आहे.
अधिक वाचा: जिल्हा मध्यवर्ती बँकांमधील नोकरभरतीसाठी राज्य शासनाने घेतला 'हा' महत्त्वपूर्ण निर्णय; वाचा सविस्तर
Web Summary : Malwadi's 'Radha,' a dwarf buffalo from Man taluka, Satara, entered the Guinness World Records as the world's shortest. Standing 2'8" tall and weighing 285 kg, Radha attracts crowds at agricultural exhibitions after her India Book of Records entry.
Web Summary : सतारा के मान तालुका के मलवडी की 'राधा', एक बौनी भैंस, दुनिया की सबसे छोटी भैंस के रूप में गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड्स में शामिल हो गई। 2'8" लंबा और 285 किलो वजन वाली राधा, इंडिया बुक ऑफ रिकॉर्ड्स में प्रवेश के बाद कृषि प्रदर्शनियों में भीड़ खींचती है।