Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >डेअरी > लसूण घासाच्या वाफ्यांमध्ये पाणी देण्याचा मार्ग होणार सोपा; जाणून घ्या चारा नियोजनाच्या फायद्याचा प्रयोग

लसूण घासाच्या वाफ्यांमध्ये पाणी देण्याचा मार्ग होणार सोपा; जाणून घ्या चारा नियोजनाच्या फायद्याचा प्रयोग

The way to water garlic grass seedlings will be easier; Learn about the benefits of fodder planning | लसूण घासाच्या वाफ्यांमध्ये पाणी देण्याचा मार्ग होणार सोपा; जाणून घ्या चारा नियोजनाच्या फायद्याचा प्रयोग

लसूण घासाच्या वाफ्यांमध्ये पाणी देण्याचा मार्ग होणार सोपा; जाणून घ्या चारा नियोजनाच्या फायद्याचा प्रयोग

Dairy Fodder Management : दुग्ध व्यवसाय यशस्वी करण्यासाठी चारा नियोजन हे अत्यंत महत्त्वाचे आहे. योग्य चाऱ्याची लागवड, त्याला वेळोवेळी पाणी देणे आणि गोठा व्यवस्थापन यावर आधारित व्यवस्थित नियोजन केल्यास दुग्ध व्यवसाय अधिक फायदेशीर ठरतो.

Dairy Fodder Management : दुग्ध व्यवसाय यशस्वी करण्यासाठी चारा नियोजन हे अत्यंत महत्त्वाचे आहे. योग्य चाऱ्याची लागवड, त्याला वेळोवेळी पाणी देणे आणि गोठा व्यवस्थापन यावर आधारित व्यवस्थित नियोजन केल्यास दुग्ध व्यवसाय अधिक फायदेशीर ठरतो.

दुग्ध व्यवसाय यशस्वी करण्यासाठी चारा नियोजन हे अत्यंत महत्त्वाचे आहे. योग्य चाऱ्याची लागवड, त्याला वेळोवेळी पाणी देणे आणि गोठा व्यवस्थापन यावर आधारित व्यवस्थित नियोजन केल्यास दुग्ध व्यवसाय अधिक फायदेशीर ठरतो. मात्र सध्याच्या काळात मजुरांची टंचाई आणि गोठा व्यवस्थापनावर भर देताना चारा नियोजनावर कमी लक्ष दिले जात असल्याने अनेक शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

अशा परिस्थितीत एका शेतकऱ्याने एक अभिनव उपाय शोधला आहे. ज्यामुळे अन्य शेतकऱ्यांना देखील मोठा फायदा होऊ शकतो. या शेतकऱ्याने आपल्या शेतात चाऱ्यासाठी २४ वाफ्यांमध्ये लसूण घासाच्या लागवडीचे नियोजन आखले आहे. या वाफ्यांना पाणी देण्यासाठी २४ बॉल व्हाल्ह फिट केले असून, यामुळे पाणी देणे अत्यंत सुलभ आणि सोयीस्कर झाले आहे.

ज्यामुळे आता वारंवार पाणी भरायला होणाऱ्या त्रासाला देखील या जुगाडामुळे पूर्णपणे टाळता येणे शक्य आहे. तसेच पाणी भरण्यासाठी शेतकऱ्यांना पाण्यात उतरण्याची गरज नाही. शिवाय या पाईपचा खर्च एकदाच होतो आणि ते दीर्घकाळ वापरता येतात त्यामुळे त्याचा खर्च हा शेतकऱ्यांसाठी वेळ बचतीचा मार्ग ठरत आहे.  

दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या फायद्याच्या या जुगाड प्रयोगाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत आणि शेतकऱ्यांकडून त्याला चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे. हा जुगाड अन्य शेतकऱ्यांसाठी एक आदर्श ठरू शकतो आणि त्याच्या मदतीने दुग्ध व्यवसाय अधिक फायदेशीर होऊ शकतो.

 

हेही वाचा : भरपूर खनिजे असलेला काटे विरहित निवडुंग ठरतोय गुरांच्या चाऱ्यासाठी फायद्याचा पर्याय; वाचा सविस्तर

Web Title : लहसुन घास के क्यारों में पानी देना हुआ आसान: चारा योजना के लाभ।

Web Summary : एक किसान ने लहसुन घास के चारा क्यारों में पानी देने को आसान बनाने के लिए बॉल वाल्व का उपयोग किया, जिससे समय और श्रम की बचत हुई। यह लागत प्रभावी तरीका डेयरी किसानों के बीच लोकप्रिय हो रहा है, जो चारा प्रबंधन चुनौतियों का एक व्यावहारिक समाधान प्रदान करता है, जिससे संभावित रूप से लाभप्रदता बढ़ सकती है।

Web Title : Simple way to water garlic grass beds: Fodder planning benefits.

Web Summary : A farmer innovatively uses ball valves to simplify watering garlic grass fodder beds, saving time and labor. This cost-effective method is gaining popularity among dairy farmers, offering a practical solution to fodder management challenges, potentially boosting profitability.