Join us
Daily Top 2Weekly Top 5

'गोकुळ' संघाच्या प्रशासकीय मंडळाने विभागप्रमुखांकडून घेतला आढावा; प्रशासन गतिमान करण्याच्या सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2026 10:55 IST

'गोकुळ' दूध संघाच्या प्रशासकीय मंडळाने शनिवारी दिवसभर विविध विभागप्रमुखांकडून आढावा घेतला. कोणत्या विभागाचे काय काम सुरू आहे? याची माहीती घेऊन त्यांनी प्रशासन अधिक गतिमान करण्याबाबतच्या सूचना दिल्या.

'गोकुळ' दूध संघाच्या प्रशासकीय मंडळाने शनिवारी दिवसभर विविध विभागप्रमुखांकडून आढावा घेतला. कोणत्या विभागाचे काय काम सुरू आहे? याची माहीती घेऊन त्यांनी प्रशासन अधिक गतिमान करण्याबाबतच्या सूचना दिल्या.

साताराचे जिल्हा उपनिबंधक संजयकुमार सुद्रिक यांच्या अध्यक्षतेखालील चारसदस्यीय प्रशासकीय मंडळाची नियुक्ती सोमवारी (दि. ४) 'गोकुळ'वर आले. त्याच सायंकाळी त्यांनी पदभार स्वीकारला.

मात्र, त्यानंतर प्रशासकीय मंडळातील अध्यक्ष सुद्रिक, सदस्य सुनील धायगुडे हे त्यांच्या पूर्वीच्या कार्यालयातील जबाबदारीमुळे गेले होते. उर्वरित सदस्य संघ व्यवस्थापनाच्या संपर्कात होते.

दर शनिवारी प्रशासकीय मंडळाची बैठक घेण्याचे ठरले होते. त्यानुसार ही बैठक घेण्यात आली, यामध्ये संकलन, अकाउंटिंगसह इतर प्रमुख विभागांवर चर्चा करण्यात आली.

काय संकलन वाढीसाठी उपाययोजना करता येतील? याबाबतही बैठकीत चर्चा झाल्याचे समजते. दूध उत्पादकांच्या हितासाठी काही नवीन संकल्पना असतील तर त्या राबवण्याची तयारीही मंडळाने दाखवल्याचे समजते.

बैठकीला सदस्य प्रदीप मालगावे, सुनील धायगुडे, सागर बलकवडे, चंद्रकांत परुळेकर, संघाचे अधिकारी उपस्थित होते.

संघाच्या नियमित कामकाजाचा शनिवारी आढावा घेण्यात आला. यामध्ये विभागनिहाय काही अडचणी आहेत का? याची माहितीही घेण्यात आली. - संजयकुमार सुद्रिक, अध्यक्ष, प्रशासकीय मंडळ, 'गोकुळ'.

हेही वाचा : तुम्हालाही नैसर्गिक गरजेपेक्षा अधिक घाम येतो का? काळजी घ्या; गंभीर आजरांचा धोका अधिक

English
हिंदी सारांश
Web Title : Gokul Board Reviews Departments, Urges Streamlined Administration

Web Summary : Gokul's administrative board reviewed departmental operations, focusing on efficiency. Led by Sanjaykumar Sudrik, the board explored strategies for increased milk collection and discussed implementing new initiatives for producer welfare. The meeting addressed departmental challenges and aimed to streamline Gokul's administration.
टॅग्स :गोकुळकोल्हापूरशेती क्षेत्रसरकारदुग्धव्यवसाय