Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >डेअरी > Sugarcane Fodder: दुभत्या जनावरांची झाली सोय; उसाच्या चाऱ्याला मिळतोय बाजारपेठेत सर्वाधिक दर

Sugarcane Fodder: दुभत्या जनावरांची झाली सोय; उसाच्या चाऱ्याला मिळतोय बाजारपेठेत सर्वाधिक दर

Sugarcane Fodder: latest news Dairy cattle are now comfortable; Sugarcane fodder is getting the highest price in the market | Sugarcane Fodder: दुभत्या जनावरांची झाली सोय; उसाच्या चाऱ्याला मिळतोय बाजारपेठेत सर्वाधिक दर

Sugarcane Fodder: दुभत्या जनावरांची झाली सोय; उसाच्या चाऱ्याला मिळतोय बाजारपेठेत सर्वाधिक दर

Sugarcane Fodder: दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत आहे. उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. अशा वेळी दुभत्या जनावरांना उसाचा हिरवा मिळाला तर चारा प्रश्न सुटेल. बाजारात उसाच्या चाऱ्याला मागणी वाढली असून त्याला दरही चांगला मिळत आहे. वाचा सविस्तर (Sugarcane fodder)

Sugarcane Fodder: दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत आहे. उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. अशा वेळी दुभत्या जनावरांना उसाचा हिरवा मिळाला तर चारा प्रश्न सुटेल. बाजारात उसाच्या चाऱ्याला मागणी वाढली असून त्याला दरही चांगला मिळत आहे. वाचा सविस्तर (Sugarcane fodder)

शेअर :

Join us
Join usNext

Sugarcane Fodder : जालना जिल्ह्यातील शेतकरी नगदी पीक म्हणून उसाची लागवड करतात. यासाठी वर्षभर खतपाणी, निंदन, खुरपण करून उसाला २,६०० ते २,७०० रुपये टन असा दर मिळतो. (Sugarcane fodder)

उसाचे नगदी पीक शेतकऱ्यांच्या पदरी निराशा टाकून जाते. ही अनेक वर्षांची परंपरा असली तरी, दुसरीकडे मात्र दुभत्या जनावरांना चारा म्हणून कडबी मंडी बाजारात विक्रीस आलेल्या उसाला साडेतीन हजार रुपये टन असा सर्वाधिक दर मिळत असल्याने शेतकरी सुखावत आहेत. (Sugarcane fodder)

जिल्ह्यातील उसाचा हंगाम संपत आल्याने साखर कारखान्यांचा पट्टा पडला आहे. लहान मोठे गुन्हाळ देखील बंद झालेले आहेत. ज्या शेतकऱ्यांनी उशिराने ऊस लावला होता, त्यांच्या उसाला आज चांगलीच गोडी आलेली आहे.(Sugarcane fodder)

यातून शेतकऱ्यांना साखर कारखान्यांपेक्षा जास्तीचा दर मिळत आहे. सोबतच ज्वारीचा वाळलेला कडबा, मका, गजरा गवताच्या चाऱ्याला देखील चांगला दर मिळत असल्याचे कडबी मंडीतील चारा विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांनी सांगितले. (fodder)

दुभत्या जनावरांना उसाचा चारा

* उन्हाळ्यात अपुऱ्या चाऱ्यामुळे दुभत्या गायी-म्हशींच्या दुधात मोठ्या प्रमाणावर घट होते. गायी-म्हशींना भरपूर दूध यावे म्हणून अनेक पशुपालक आपल्या दुभत्या जनावरांना पौष्टिक चारा म्हणून शेतकऱ्यांकडून ऊस विकत घेऊन जनावरांना खायला देतात.

* सध्या शेतकऱ्यांच्या उसाच्या चाऱ्याला साडेतीन हजार रुपये टन इतका दर मिळत आहे. विशेष म्हणजे शेतामधील ऊस तोडून तो थेट विक्रीसाठी बाजारात आणला जातो. त्यासोबत पालापाचोळा देखील असतो. त्यासोबत उसाचे वजन करण्यात येते.

उसाला मागणी

दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत आहे. उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. अशा वेळी थंडगार उसाचा रस पिण्यासाठी पावले रसवंतीगृहाकडे वळत आहेत.
त्यामुळे रसवंतीगृहाकडून उसाच्या रसाकरिता जास्तीच्या उसाची मागणी होत आहे. यासाठी रसवंतीगृह चालकांकडून जास्तीच्या दराने ऊस खरेदी करण्यात येत आहे.

यंदा हिरवा चारा स्वस्त

मागील वर्षीच्या तुलनेत यंदा उसाचे क्षेत्र जास्त होते. त्यामुळे उसाचे वाडे मोठ्या प्रमाणावर विक्रीस येत होते. त्यामुळे हिख्या चाऱ्याचा दर कमी आहे. मागील वर्षी हिरवा चारा ३ हजार रुपयांना १०५ पेंड्या असा दर होता.

ओला चारा१ हजार ३०० रुपयांना १०५ पेंड्या
कडबा वाळलेला २० रुपये पेंडी
मक्याची आठ काड्यांची एक पेंडी१० रुपये
मका              २ हजार रुपये टन

हे ही वाचा सविस्तर : 'HTBT' Bogus Seeds: 'एचटीबीटी' बियाण्यांच्या विक्रीत 'या' चार राज्यांतील दलालांचे कनेक्शन वाचा सविस्तर

Web Title: Sugarcane Fodder: latest news Dairy cattle are now comfortable; Sugarcane fodder is getting the highest price in the market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.