Join us

कोल्हापूर जिल्ह्यात एवढे दूध उत्पादक राहणार अनुदानापासून वंचित

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2024 5:53 PM

मार्चअखेर अनुदानाचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावेच लागणार आहेत. त्यामुळे दोन महिन्यांची माहिती भरण्यासाठी सोमवार (दि. २५) पर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

राजाराम लोंढेकोल्हापूर : गायदूध अनुदानापासून जिल्ह्यातील सुमारे ५१ हजार १३३ शेतकरी अनुदानापासून वंचित राहणार आहेत. पहिल्या दहा दिवसात (११ ते २० जानेवारी) ४० हजार शेतकऱ्यांनाच अनुदान मिळणार आहे.

दहा दिवसात ६ कोटी अनुदान मिळणे अपेक्षित होते. मात्र, २ कोटी ५९ लाख रुपये अनुदान मिळणार आहे. जाचक अटी आणि तांत्रिक अडचणीमुळे पात्र शेतकरी अपात्र ठरणार आहेत. 

गाय दुधाचे दर कमी झाल्याने राज्य शासनाने गाय दूध उत्पादकांना दोन महिन्यासाठी (११ जानेवारी ते १० मार्च २०२४ अखेर) प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला.

त्यानुसार निकष देऊन उत्पादकांसह पशुधनाची माहीती ऑनलाइन भरण्याची सूचना दिली. जिल्ह्यात 'गोकुळ'चे ८१ हजार दुध उत्पादक आहेत. मात्र, माहिती भरण्याची प्रक्रिया क्लिष्ट असल्याने अनेक शेतकऱ्यांना सहभाग घेता आला नाही. काहींनी मराठीतच माहीती भरल्याने तांत्रिक कारणामुळे अपात्र ठरले आहेत.

आतापर्यंत 'गोकुळ', 'वारणा', 'वैजनाथ' संघांच्या २४ हजार ५९० शेतकऱ्यांच्या खात्यावर १ कोटी ५१ लाख रुपये जमा झाले. आता १ कोटी १ लाख ५२ हजार वर्ग होण्याची प्रक्रिया सुरू आहे. जिल्ह्यात ९१ हजार ६०१ गाय दूध उत्पादक शेतकरी आहेत. त्यापैकी ४० हजार ४६६ शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे. उर्वरित ५१ हजार जण वंचित राहण्याची शक्यता आहे.

यामुळे अनुदानापासून राहावे लागले वंचित• दूध उत्पादकांचा कॅशलेस व्यवहार नाही• पशुधन अॅपवर नोंदणी नाही. माहिती मराठीत भरली आहे.• पती-पत्नींसाठी एकच बँक खाते क्रमांक• एकाच उत्पादकाचे दोन संस्थेत दूध• मोबाइल आणि आधार कार्ड क्रमांक चुकीचा

सोमवारपर्यंत माहिती भरण्याची मुदतआता पहिल्या दहा दिवसांची माहिती भरण्यात आलेली आहे; पण मार्चअखेर अनुदानाचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावेच लागणार आहेत. त्यामुळे दोन महिन्यांची माहिती भरण्यासाठी सोमवार (दि. २५) पर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

दुग्ध विभागाच्या प्रयत्नामुळेच सर्वाधिक अनुदान दुग्ध विभाग व गोकुळ दूध संघाच्या यंत्रणेमुळे राज्यात सर्वाधिक अनुदान कोल्हापुरात मिळाले आहे. दुग्ध विभागात अपुरी कर्मचारी संख्या असतानाही त्यांनी युद्ध पातळीवर काम केल्यानेच हे शक्य झाले.

जिल्ह्यात हे आहेत दूध संघ व त्यांचे गाय दूध उत्पादकगोकुळ ८१ हजारवारणा ८०१७स्वाभिमानी ६३४श्री दत्त इंडिया ४१९छत्रपती शाहू १६२विमल डेअरी १०९हॅपी इंडिया १०१स्वामी समर्थ ९१चौगुले मिल्क २१वैजनाथ मिल्क १०

टॅग्स :दुग्धव्यवसायदूधशेतकरीसरकारकोल्हापूरगोकुळगायराज्य सरकार