Join us
Daily Top 2Weekly Top 5

मैहसाणा, जाफराबादी नको 'मुरा'च हवी; दूध उत्पादकांना का लागलाय मुरा म्हशींचा लळा? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2025 15:55 IST

Murrah Mhais एनडीडीबीने केर्ली (ता. करवीर) येथे सुरू केलेल्या जातिवंत म्हशींच्या गोठ्यातून गेल्या सहा महिन्यांत ९० म्हशींची विक्री झाली आहे.

कोल्हापूर : एनडीडीबीने केर्ली (ता. करवीर) येथे सुरू केलेल्या जातिवंत म्हशींच्या गोठ्यातून गेल्या सहा महिन्यांत ९० म्हशींची विक्री झाली आहे.

'मेहसाणा', 'जाफराबादी', 'मुरा' या म्हशी तुलनेत अधिक दूध देणाऱ्या आहेत. मात्र, जिल्ह्यातील दूध उत्पादकांची 'मुरा' जातीच्या म्हशीला अधिक पसंती आहे.

'गोकुळ'च्या वतीने परराज्यातील म्हैस खरेदीसाठी ४० हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. त्यातून, येथील शेतकरी हरियाणा, पंजाब, गुजरात येथे जाऊन जातीवंत म्हशीची खरेदी करतात.

पण शेतकऱ्यांची फसवणूक होते, हे दूध संघाच्या लक्षात आल्यानंतर एनडीडीबी'च्या माध्यमातून केर्ली येथे जातीवंत म्हशींचा गोठा सुरू केला आहे.

ऑक्टोबरपासून हा गोठा सुरू असून, आतापर्यंत ९० म्हशींची विक्री झाली आहे. 'एनडीडीबी'ची तज्ज्ञ टीम हरियाणा, पंजाब येथून म्हशींची खरेदी करून गोठ्यावर आणतात.

येथे शेतकऱ्यांनी दुधाची तीन-चार दिवस खात्री करून म्हैस खरेदी करायची, अशी पद्धत असल्याने शेतकऱ्यांचा या गोठ्याकडे ओढा वाढला आहे. एकूण ९० पैकी २५ म्हशी या परजिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरेदी केल्या आहेत.

कोल्हापूरच्या वातावरणाशी जुळवून घेणारी 'मुरा' म्हैस आहे. 'मेहसाणा', 'जाफराबादी' या म्हशींना येथील वातावरण त्रासदायक असल्याने दूध कमी देणे आदी तक्रारी येतात. त्यामुळे शेतकरी 'मुरा' म्हशी खरेदीकडे वळला आहे.

दुधावर म्हशीची किंमत...दोन्ही वेळचे दहा लिटर दूध : १ लाख २० हजार.तेथून पुढे एका लिटरसाठी : ३ हजार रुपयांप्रमाणे वाढ.

दुधाची खात्री करून शेतकरी म्हैस खरेदी करू शकतात. हरियाणा, पंजाब येथील दरापेक्षा कमी, वाहतूक खर्चात बचत आणि दुधाची खात्री यामुळे शेतकऱ्यांकडून गोठ्याला चांगला प्रतिसाद आहे. - डॉ. यु. व्ही. मोगले

अधिक वाचा: जनावरांना मान्सूनपूर्व लसीकरण का व कसे करावे? काय आहेत फायदे? वाचा सविस्तर

टॅग्स :दुग्धव्यवसायदूधकोल्हापूरगोकुळपंजाबहरयाणाशेतकरी