Join us
Daily Top 2Weekly Top 5

दूध खरेदीचा दर २८ रुपयांवरच थांबला; चारा आणि पशुखाद्याच्या दरात मात्र भडका उडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 14:32 IST

pashu khadya market rate एकीकडे जनावरांसाठीचे खाद्य चारा महाग झालाय, तर दुसरीकडे दुधाचे दर मात्र दिवसेंदिवस ढासळत चालले आहेत.

एकीकडे जनावरांसाठीचे खाद्य चारा महाग झालाय, तर दुसरीकडे दुधाचे दर मात्र दिवसेंदिवस ढासळत चालले आहेत.

या कात्रीत दूध उत्पादकांचा अडचणीत आला व्यवसाय आहे. सरकारला याचे काही देणेघेणे नाही. यामुळे दूध उत्पादक सैरभैर झाले आहेत.

मका, सरकी पेंड, वालिस, कडबा, औषधोपचार महागले. यामुळे एका जनावराचा रोजचा खर्च मजुरीसह ६०० रुपयांवर पोहोचला. पण दूध खरेदीचा दर मात्र सरासरी २७-२८ रुपयांवरच अडकलेला.

एवढेच नाही तर अनेक ठिकाणी खासगी दूध संघ मनमानी करत थेट दर कपात करतात. "जनावरं पाळायची की कर्ज फेडायचं?" असा सवाल आज प्रत्येक दूध उत्पादकांना पडला आहे.

अनेक ठिकाणी दूध टाकून देण्याची वेळ आली आहे. एवढं सगळं होत असताना शासन मात्र बघ्याची भूमिका घेत आहे. निवडणुकीच्या वेळी 'शेतकरी राजा' आठवतो, पण आज दूध उत्पादक रस्त्यावर येण्याची वेळ आली तरी सरकार गप्प!

अनुदानाच्या घोषणा हवेत, पण प्रत्यक्षात पैसा कुठेच दिसत नाही. चाऱ्याच्या दरावर नियंत्रण नाही, दुधाला हमीभाव नाही आणि दूध संघांच्या मनमानीला लगाम नाही.

असा आहे खाद्याचा दर◼️ पेंड : २०५०-२१००◼️ वालीस : १४००◼️ कांडी : १६००-१७००◼️ शेंगदाणा पेंड : २८००-३०००◼️ प्रोटीन : १३००-१३५०

चाऱ्याचे दर◼️ ऊस : ४,२००-४,५०० टन.◼️ माका : ४,५०० टन.◼️ घास : ५ रुपये किलो.◼️ सुका चारा : ६-७ रुपये किलो.◼️ गिन्नी गवत : १५०० गुंठा.

खाद्य-चारा महागला, पशुधनाचे दर ही घसरले, अनुदान केवळ घोषणेतच अडकले. शासनाने दुधाला किमान ५० रुपयांचा भाव द्यावा. चारा व जनावरांना भाव नसल्याने भाकड जनावरे संभाळण्याची वेळ आली. - भानुदास तोडमल, शेतकरी

सध्या दुधाला प्रति लीटर ३६ ते ३७ रुपये भाव आहे. दुधाला मागणी चांगली असून पुरवठा कमी असल्याने दर वाढीची शक्यता आहे. फेब्रुवारीनंतर दुग्धजन्य पदार्थांची मागणी वाढते, त्यामुळे भविष्यात दुधाचे दर ४० रुपयांच्या पुढे जातील. - सचिन उंडे, अध्यक्ष, श्रीकृष्ण मिल्क

अधिक वाचा: ट्रम्पचा झटका कापूस, सोयाबीन अन् इथेनॉल उत्पादकांना फटका; शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणार

English
हिंदी सारांश
Web Title : Milk prices stagnant, fodder costs soar, farmers struggle in Maharashtra.

Web Summary : Maharashtra's milk producers face crisis as fodder prices surge while milk rates remain fixed. Farmers struggle with rising costs, low returns, and government inaction. Many are forced to dump milk, demanding fair prices and fodder cost control. The situation is dire.
टॅग्स :दुग्धव्यवसायगायदूधसरकारशेतकरीनिवडणूक 2026मकापीकऊस