Goat Farming : आज, शेळी गरिबांची गाय म्हणून अनेक कुटुंबांची पसंती बनली आहे. गेल्या काही वर्षात शेळीपालन (Shelipalan) करणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. शेळ्या पाळणाऱ्यांची (Goat Farming) संख्या सर्वात जास्त आहे. राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पशुपालनासाठी कर्ज आणि अनुदान दिले जाते.
या अभियानाच्या आकडेवारीनुसार मागील काही वर्षात शेळीपालनासाठी जास्तीत जास्त कर्जे मागितली जात असल्याचे समोर आले आहे. विशेषतः देशातील पाच राज्ये अशी आहेत जिथे शेळीपालनासाठी विक्रमी संख्येने अर्ज आले आहेत. एवढेच नाही तर केंद्र सरकारच्या संस्थेत शेळीपालन प्रशिक्षणासाठी अर्जदारांना दोन ते तीन महिन्यांची प्रतीक्षा करावी लागत आहे.
कुठे वाढतंय शेळीपालन
राष्ट्रीय पशुधन अभियानासाठी प्रत्येक राज्यातून अर्ज येतात. पशुपालन आणि संबंधित कामांसाठी अर्ज येतात. प्रत्येक राज्यातून येणाऱ्या एकूण अर्जाची संख्या पाहिली तर बहुतेक अर्ज हे शेळीपालनाशी संबंधित आहेत. जाणून घेऊया देशातील काही निवडक राज्यातील आकडेवारी, यामध्ये पशुधन योजनांसाठी आलेले अर्ज आणि शेळीपालनासाठी आलेले अर्ज...
कर्नाटक
एकूण अर्जांची संख्या - १०४०
शेळीपालनासाठी - ९५६
मध्य प्रदेश
एकूण अर्जांची संख्या- ४१५
शेळीपालनासाठी - ३४१
तेलंगणा
एकूण अर्जांची संख्या- ४५७
शेळीपालनासाठी - ४०९
महाराष्ट्र
एकूण अर्जांची संख्या- ३१५
शेळीपालनासाठी - २४०
आंध्र प्रदेश
एकूण अर्जांची संख्या- २४३
शेळीपालनासाठी - २१५
राजस्थान
एकूण अर्जांची संख्या- १२५
शेळीपालनासाठी- ११९.
तामिळनाडू
एकूण अर्जांची संख्या- १४२
शेळीपालनासाठी - १३१
उत्तर प्रदेश
एकूण अर्जांची संख्या- १४५
शेळीपालनासाठी- ११६
आसाम
एकूण अर्जांची संख्या- ३८
शेळीपालनासाठी- २१
छत्तीसगड
एकूण अर्जांची संख्या- २०
शेळीपालनासाठी- १८
गुजरात
एकूण अर्जांची संख्या- ०३
शेळीपालनासाठी- ०२