Cow Pregnancy Test : पशुपालन, दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक महत्वपूर्ण तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. राष्ट्रीय अन्न तंत्रज्ञान उद्योजकता आणि व्यवस्थापन संस्था (NIFTEM) यांच्या माध्यमातून हे किट विकसित केली आहे, ज्यामुळे शेतकरी घरच्या घरी गायीची गर्भधारणा चाचणी करू शकतात. यासाठी केवळ रक्ताच्या एका थेंबांची आवश्यकता असणार आहे. काय आहे हे तंत्रज्ञान समजून घेऊयात....
देशातील अनेक शेतकरीगायी म्हशी पाळतात. अशा शेतकऱ्यांना हे किट एक वरदान आहे. गाय गर्भवती आहे की नाही हे सहजपणे आणि त्वरित ठरविता येणार आहे. दुसरीकडे पारंपारिक गर्भधारणा चाचणी पद्धती केवळ वेळ घेत नाहीत तर गाय आणि गर्भ दोघांसाठीही धोकादायक ठरू शकतात. कधीकधी, गर्भ नष्ट देखील होतात. मात्र हे नवीन किट पूर्णपणे सुरक्षित आणि सोपे आहे, ज्यामुळे कोणत्याही जोखीमशिवाय चाचणी करता येते.
२८ व्या दिवशी किट वापराज्या शेतकऱ्यांना हे किट वापरायचे आहे, त्यांनी ते गर्भधारणेच्या २८ व्या दिवशीच वापरावे, हे लक्षात ठेवा. या वेळेपूर्वी ते वापरल्याने चुकीचे निकाल मिळू शकतात. हे किट गर्भधारणेच्या २८ व्या दिवशी अचूक निकाल देते.
देशातील शेतकऱ्यांसाठी फायदेशीरभारतीय शेतकऱ्यांसाठी हे किट फायदेशीर ठरणार आहे. कारण या किटमुळे घरच्या घरी गर्भधारणा करता येणार आहे. त्यामुळे यापूर्वी पशुवैद्यकीय दवाखाने व इतर ठिकाणी जावे लागायचे, ते आता थांबणार आहे. यामुळे केवळ वेळ वाचणार नाही तर खर्चही कमी होईल.
Web Summary : Farmers can now test cow pregnancy at home using a new kit developed by NIFTEM. Requires only a blood drop, providing accurate results after 28 days. Saves time and money compared to traditional methods, benefiting Indian farmers.
Web Summary : एनआईएफटीईएम द्वारा विकसित नई किट से किसान अब घर पर गाय की गर्भावस्था की जाँच कर सकते हैं। केवल एक रक्त की बूंद की आवश्यकता है, 28 दिनों के बाद सटीक परिणाम मिलते हैं। पारंपरिक तरीकों की तुलना में समय और धन की बचत होती है, जिससे भारतीय किसानों को लाभ होता है।