Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >डेअरी > 'या' बाजारात इअर टॅगिंगशिवाय गुरांची खरेदी-विक्री होणार नाही, वाचा सविस्तर 

'या' बाजारात इअर टॅगिंगशिवाय गुरांची खरेदी-विक्री होणार नाही, वाचा सविस्तर 

Latest News No buying and selling of cattle without ear tagging in Chalisgaon market | 'या' बाजारात इअर टॅगिंगशिवाय गुरांची खरेदी-विक्री होणार नाही, वाचा सविस्तर 

'या' बाजारात इअर टॅगिंगशिवाय गुरांची खरेदी-विक्री होणार नाही, वाचा सविस्तर 

Agriculture News : गुरांच्या बाजाराच्या दिवशी फक्त 'इअर टॅगिंग' असलेल्या जनावरांनाच बाजारात प्रवेश दिला.

Agriculture News : गुरांच्या बाजाराच्या दिवशी फक्त 'इअर टॅगिंग' असलेल्या जनावरांनाच बाजारात प्रवेश दिला.

शेअर :

Join us
Join usNext

चाळीसगाव : 'इअर टॅगिंग' (Ear Tagging) असल्याशिवाय गुरांची खरेदी-विक्री करता येणार नाही, असा निर्णय येथील बाजार समितीने (Chalisgoan Bail Bajar) घेतला असून, शनिवारी गुरांच्या बाजाराच्या दिवशी फक्त 'इअर टॅगिंग' असलेल्या जनावरांनाच बाजारात प्रवेश दिला. यामुळे बहुतांशी शेतकरी व पशुपालकांना जनावरे पुन्हा माघारी घेऊन जावी लागली. 

खरीप हंगामाची (Kharif Season) तयारी सुरू असल्याने गुरांच्या बाजारात मोठी उलाढाल होते. ७ जून रोजी भरणाऱ्या बाजारातही 'इअर टॅगिंग' झालेल्या गुरांनाच प्रवेश दिला जाणार आहे. पशुधन बाजारात इअर टॅगिंगची सक्ती चाळीसगाव बाजार समितीत दर शनिवारी भरणाऱ्या गुरांच्या बाजारात मोठी उलाढाल होते. शेजारील मालेगाव, धुळे, कन्नड, पाचोरा, भडगाव आदी ठिकाणांहूनही गुरे विक्रीसाठी आणली जातात. 

शासनाने गुरांसाठी 'इअर टॅगिंग' अत्यावश्यक केले असून, टॅगिंग नसलेल्या गुरांची खरेदी-विक्री करू नये, अशी मागणी काही संघटनांनी चाळीसगाव बाजार समितीकडे केली होती. त्यानुसार शनिवारी गुरांच्या बाजारात 'इअर टॅगिंग' असणाऱ्या गुरांनाच प्रवेश दिला गेला. यामुळे अत्यंत तुरळक व्यवहार झाले. बाजारात पूर्णतः शुकशुकाट दिसून आला. याबाबत बाजार समितीने आगाऊ सूचनाही दिली होती.

मोकळ्या जागांवर जनावरांची खरेदी-विक्री
इअरटैगिंग नसणाऱ्या जनावरांना बाजार समितीने प्रवेश नाकारल्यानंतर घाटरोड परिसरात शनिवारी काही मोकळ्या जागांवर गुरांचे खरेदी-विक्रीचे व्यवहार होत असल्याचे दिसून आले. खासगी व्यापाऱ्यांनी गुरे खरेदी केली, तर काहींनी गुरे पुन्हा माघारी नेले.

कुठल्या तरी कारणामुळे गुरांची खरेदी-विक्री बंद ठेवणे हे शेतकरी हिताचे नाही. मध्यंतरी हमाल-मापाडी व व्यापाऱ्यांच्या संघर्षात भुसार बाजार ८ दिवस बंद होता. हंगामाची तयारी सुरू असताना गुरांची खरेदी-विक्री बंद ठेवणे योग्य नाही.
- दिनेश पाटील, संचालक, बाजार समिती

इअर टॅगिंग झालेल्या जनावरांनाच बाजार प्रवेश दिला जावा. याबाबत काही संघटनांनी मागणी केली होती. याविषयी पोलिसांकडूनही सूचना मिळाल्यानंतर निर्णय घेण्यात आला. वाहनांमध्ये किती गुरे भरायची याबाबत सूचना दिल्या आहेत. इअर टॅगिंग असणाऱ्या गुरांचेच शनिवारी व्यवहार झाले. पशुवैद्यकीय डॉक्टरांकडूनही गुरांचे टैगिंग करून घेतले.
- मच्छींद्र राठोड, सभापती, बाजार समिती, चाळीसगाव.

Web Title: Latest News No buying and selling of cattle without ear tagging in Chalisgaon market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.