Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >डेअरी > Milk Revolution 2.0 : दूध व्यवसायात मोठी क्रांती; 'श्वेत क्रांती २.०'ने बदलणार ग्रामीण चित्र? वाचा सविस्तर

Milk Revolution 2.0 : दूध व्यवसायात मोठी क्रांती; 'श्वेत क्रांती २.०'ने बदलणार ग्रामीण चित्र? वाचा सविस्तर

latest news Milk Revolution 2.0: A big revolution in the milk business; Will 'White Revolution 2.0' change the rural picture? Read in detail | Milk Revolution 2.0 : दूध व्यवसायात मोठी क्रांती; 'श्वेत क्रांती २.०'ने बदलणार ग्रामीण चित्र? वाचा सविस्तर

Milk Revolution 2.0 : दूध व्यवसायात मोठी क्रांती; 'श्वेत क्रांती २.०'ने बदलणार ग्रामीण चित्र? वाचा सविस्तर

Milk Revolution 2.0 : दुग्ध व्यवसायाला नवी दिशा देत शेतकरी आणि महिलांसाठी मोठी संधी उपलब्ध होत आहे. श्वेत क्रांती २.० अभियानाच्या माध्यमातून दुग्ध सहकारी संस्थांचा विस्तार, दूध खरेदीत वाढ आणि महिलांचे आर्थिक सक्षमीकरण साध्य करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या उपक्रमामुळे दुग्ध उत्पादकांना स्थैर्य आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.(Milk Revolution)

Milk Revolution 2.0 : दुग्ध व्यवसायाला नवी दिशा देत शेतकरी आणि महिलांसाठी मोठी संधी उपलब्ध होत आहे. श्वेत क्रांती २.० अभियानाच्या माध्यमातून दुग्ध सहकारी संस्थांचा विस्तार, दूध खरेदीत वाढ आणि महिलांचे आर्थिक सक्षमीकरण साध्य करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या उपक्रमामुळे दुग्ध उत्पादकांना स्थैर्य आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.(Milk Revolution)

Milk Revolution 2.0 : ग्रामीण अर्थव्यवस्थेला गती देत दुग्ध व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी केंद्रीय सहकार मंत्रालय यांच्या पुढाकारातून सुरू करण्यात आलेल्या 'श्वेत क्रांती २.०' अभियानाचा अकोला जिल्ह्यातील दुग्ध उत्पादक शेतकरी व महिला बचतगटांना मोठा लाभ होणार आहे.(Milk Revolution)

सहकाराच्या माध्यमातून दुग्ध व्यवसाय मजबूत करत ग्रामीण भागात रोजगारनिर्मिती आणि महिलांचे आर्थिक सक्षमीकरण साध्य करण्याचा या अभियानाचा प्रमुख उद्देश आहे.(Milk Revolution)

१००७ लाख किलो दूध खरेदीचे लक्ष्य

या अभियानाअंतर्गत २०२८-२९ पर्यंत देशभरातील दुग्ध सहकारी संस्थांकडून दररोज १००७ लाख किलो दूध खरेदी करण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी दुहेरी धोरण राबविण्यात येणार आहे.

दुग्ध सहकारी संस्थांच्या कार्यक्षेत्राचा विस्तार

संस्थांची कार्यक्षमता आणि व्यवस्थापन क्षमता वाढविणे

या माध्यमातून ग्रामीण दूध संकलन साखळी अधिक सक्षम केली जाणार आहे.

१.२० लाख संस्थांचे बळकटीकरण

'श्वेत क्रांती २.०' अंतर्गत देशभरात सुमारे १ लाख २० हजार नवीन किंवा विद्यमान दुग्ध सहकारी संस्था, डीसीएस आणि बहुउद्देशीय प्राथमिक कृषी पतसंस्था स्थापन व बळकट करण्यात येणार आहेत.

याशिवाय सध्या कार्यरत असलेल्या ४६ हजार ४२२ दुग्ध सहकारी संस्थांना अधिक सक्षम करून उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण करणे आणि पोषण उपलब्धता वाढविणे हेही उद्दिष्ट आहे.

महिलांसाठी सुवर्णसंधी

दुग्ध व्यवसायात सुमारे ७० टक्के महिलांचा सहभाग असूनही असंघटित रचनेमुळे त्यांचे योगदान अनेकदा दुर्लक्षित राहते. या पार्श्वभूमीवर महिलांच्या नेतृत्वाखालील दुग्ध सहकारी संस्थांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे.

प्रत्येक पंचायत व गावात दुग्ध सहकारी संस्था स्थापन करण्यावर भर दिला जाणार असून त्यामुळे अकोला जिल्ह्यातील महिला दुग्ध उत्पादकांना संघटित क्षेत्रात सहभागी होण्याची मोठी संधी उपलब्ध होईल.

यामुळे महिलांचे आर्थिक सक्षमीकरण होईल

कुटुंबाच्या उत्पन्नात वाढ

ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळेल

दुर्गम भागालाही बाजारपेठ

दुर्गम व आदिवासी भागातील दुग्ध उत्पादकांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे, तसेच संघटित दुग्ध सहकारी संस्थांचा वाटा वाढविणे हे या योजनेचे प्रमुख ध्येय आहे. देशभरात ७५ हजार नवीन दुग्ध सहकारी संस्था स्थापन करण्याचा प्रस्ताव असून, आतापर्यंत दुर्लक्षित राहिलेल्या गावांमध्येही दुग्ध सहकाराची व्याप्ती वाढवली जाणार आहे.

अकोल्यात दूध क्रांतीची अपेक्षा

'श्वेत क्रांती २.०' अभियानामुळे अकोला जिल्ह्यात दुग्ध व्यवसायाला नवे बळ मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण विकासाचा वेग वाढत शेतकरी व महिलांना आर्थिक स्थैर्याची नवी दिशा मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.

हे अभियान दुग्ध उत्पादकांसाठी केवळ योजना नसून ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवसंजीवनी देणारे पाऊल ठरणार आहे.

हे ही वाचा सविस्तर :७५ लाखांची बुटकी म्हैस; ५० लाखांचा ‘सोन्या’ बैल : परळीत पशुधनाचा जल्लोष!

Web Title : दुग्ध क्रांति 2.0: डेयरी फार्मिंग के माध्यम से ग्रामीण भारत का परिवर्तन

Web Summary : 'श्वेत क्रांति 2.0' का उद्देश्य डेयरी क्षेत्र का विस्तार करके ग्रामीण अर्थव्यवस्थाओं को बढ़ावा देना है। इसका लक्ष्य दूध की खरीद बढ़ाना, डेयरी सहकारी समितियों को मजबूत करना, महिलाओं को सशक्त बनाना और दूरदराज के क्षेत्रों तक पहुंचना, किसानों और महिलाओं के लिए आर्थिक स्थिरता को बढ़ावा देना है।

Web Title : Milk Revolution 2.0: Transforming Rural India Through Dairy Farming

Web Summary : The 'White Revolution 2.0' aims to boost rural economies by expanding the dairy sector. It targets increased milk procurement, strengthens dairy cooperatives, empowers women, and reaches remote areas, fostering economic stability for farmers and women.