Milk Production : राज्यातील दुग्ध उत्पादनावर गेल्या तीन वर्षांची अधिकृत आकडेवारी पशुसंवर्धन आयुक्तालयाने जाहीर केली असून, त्यातून पुणे आणि नाशिक विभागाने बाजी मारली आहे. (Milk Production)
तर कोकण आणि अमरावती विभागात सर्वात कमी दूध उत्पादन होत असल्याचे चित्र समोर आले आहे. दुग्धव्यवसाय हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा आधार असूनही विदर्भ आणि कोकण विभागात या व्यवसायाच्या वाढीस आवश्यक तेवढे प्रयत्न होत नसल्याची खंत शेतकरी व्यक्त करत आहेत. (Milk Production)
विभागनिहाय दूध उत्पादन – तीन वर्षांचा तुलनात्मक आढावा
पुणे नेहमीच पहिल्या क्रमांकावर
पुणे विभागात दूध उत्पादनात सातत्याने वाढ होत आहे.
२०२२-२३ : ६५.३३ लाख मेट्रिक टन
२०२४-२५ : ७३.४० लाख मेट्रिक टन
ही वाढ संगठित डेअरी व्यवस्था, मोठी बाजारपेठ आणि पशुपालकांना उपलब्ध सुविधा यांचे प्रतिक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
नाशिक वेगाने वाढणारा विभाग
२०२२-२३ : ३८.५१ लाख मे.टन
२०२४-२५ : ४५.०० लाख मे.टन
नाशिकमध्ये शेतीपूरक व्यवसायांना मिळणारा चांगला प्रतिसाद व डेअरी पायाभूत सुविधा वाढत असल्याने उत्पादनात वाढ दिसून येते.
कोकण राज्यात सर्वात कमी उत्पादन
कोकण विभागाचे उत्पादन स्थिर असले तरी वाढ न झाल्याचे स्पष्ट होते.
दरवर्षी सरासरी ४.७५ ते ४.८० लाख मे.टन
भौगोलिक परिस्थिती, चारापाणी अभाव आणि मर्यादित जनावरे यामुळे उत्पादनात स्थिरता.
अमरावती व नागपूर, विदर्भ अजून मागे
अमरावती : २०२४-२५ – ६.२५ लाख मे.टन (घटलेले/स्थिर)
नागपूर : २०२४-२५ – ७.४४ लाख मे.टन (किंचित वाढ)
विदर्भातील काही भागात पारंपरिक दुधव्यवसाय कमी होत असून आधुनिक सुविधांचा अभाव जाणवतो.
अमरावती विभागातील मुख्य उणिवा
विदर्भातील शेतकरी आणि दूध व्यावसायिकांनी पुढील अडचणी मांडल्या आहेत:
दुग्ध संकलन केंद्रांची कमतरता
वाशिम येथील शासकीय दूध संकलन केंद्र १२ वर्षांपासून बंद.
खाजगी व सहकारी संकलन केंद्रांचे जाळे अत्यंत मर्यादित.
सहकारी संस्थांचा ऱ्हास
दूध उत्पादक सहकारी संस्थांची संख्या आणि कार्यक्षमता घटत असल्याने शेतकऱ्यांना दूध विक्रीत अडचणी.
चाऱ्याची टंचाई
चारापिकांना पुरेशी प्रोत्साहन नाही.
पावसातील अनिश्चितता आणि दुष्काळी परिस्थितीमुळे हिरवा चारा कमी.
दुग्धविकास प्रकल्पांचा अभाव
गायी, म्हशींची सुधारित जात उपलब्ध नाही
वैज्ञानिक पद्धतींचा अभाव
कृत्रिम रेतन, पशुवैद्यकीय सेवा मर्यादित
वाढता खर्च; कमी उत्पन्न
खाद्य, औषधे, श्रम खर्च मोठ्या प्रमाणात वाढला
उत्पादन आणि विक्रीत ताळमेळ बसत नाही
लहान उत्पादकांना तोटा
वाशिमचे शेतकरी वैभव देशमुख आणि सुरेश खोरणे यांनी सांगितले की, 'जनावरांना चारा, पाणी आणि आरोग्य सेवा यांचा खर्च वाढत आहे, पण दूधाला मिळणारा दर खर्च भागवू शकत नाही.' त्यामुळे लहान उत्पादकांना तोटा सहन करावा लागत आहे.
विदर्भासाठी विशेष उपाययोजना हव्यात
* अधिक दूध संकलन केंद्रे सुरू करावीत
* बंद असलेले शासकीय केंद्र तातडीने सुरू करावेत
* चारा लागवडीसाठी अनुदान वाढवावे
* आधुनिक डेअरी प्रकल्पांसाठी विशेष पॅकेज जाहीर करावे
* सुधारित जात उपलब्ध करून द्यावी
* नाशिक–पुणेप्रमाणे मजबूत सहकारी डेअरी नेटवर्क उभारावे
राज्यातील दुग्ध व्यवसायात असमान वाढ दिसत आहे. पुणे–नाशिक विभागात उत्पादन वेगाने वाढत असताना कोकण आणि विदर्भ विशेषतः अमरावती विभाग मागे पडत आहे.
राज्य शासनाने विदर्भासाठी स्वतंत्र दुग्धविकास आराखडा तयार केल्यास दूध उत्पादनात मोठी वाढ होऊ शकते, असा विश्वास शेतकरी व्यक्त करत आहेत.
