Dairy Farming :दुग्ध व्यवसाय (Milk Business) करण्यासाठी, बहुतेकदा गाय किंवा म्हैस किंवा दोन्ही पाळले जातात. गायीचेदूध आणि त्यापासून बनवलेले तूप म्हशीच्या दुधापेक्षा (Cow Milk) चांगले मानले जाते. देशात असे अनेक डेअरी फार्म (Dairy Farm) आहेत, ज्या ठिकाणी पूर्णपणे गायी पाळल्या जातात, त्यांचे संगोपन केले जाते. शेतकऱ्यांना दुध व्यवसाय सुरू करायचा असल्यास सर्वप्रथम दुभत्या गायी, म्हशींची खरेदी करणे क्रमप्राप्त ठरते.
शेतकऱ्यांना जर चांगल्या जातीची आणि जास्त दूध देणारी गाय किंवा म्हैस मिळाली तर दूध व्यवसाय करण्यास सोपे जाते. मात्र खरेदी करताना चूक झाली किंवा फसवणूक झाली तर शेतकऱ्याच्या खिशाला झळ बसते. म्हणून, जेव्हाही तुम्ही जनावरे बाजारात किंवा एखाद्या कुटुंबाकडून खरेदी करण्यासाठी जाता तेव्हा सर्वप्रथम, प्रत्येक ठिकाणी जनावराची पूर्णपणे तपासणी करा. शक्य असल्यास, दोन-तीन दिवस शेतात राहून जनावरांचे निरीक्षण करा.
जर तुम्ही गाय खरेदी करणार असाल तर हे 4 मुद्दे नक्की तपासा
सर्वप्रथम गाय किंवा म्हशींची अंगकाठी पाहून घ्या.
- डोळे तेजस्वी आणि मान पातळ असावी.
- कासे पोटाला चांगले चिकटलेले असावे.
- कासेच्या त्वचेवर रक्तवाहिन्यांच्या चांगल्या जाळ्या असाव्यात.
- कासेचे चारही भाग चांगले सीमांकित केलेले असावेत.
या गोष्टी लक्षात ठेवा
- जनावर खरेदी करताना, कोणत्या जातीचे हे पाहून घ्या.
- ज्या पशुपालकाकडून तुम्ही गाय खरेदी करत आहात, त्यांच्याकडून खरेदी केलेल्या गाय, म्हशींची पार्श्वभूमी तपासून घ्या.
- जर तुम्हाला दुभत्या गायी घ्यायच्या असतील तर फक्त एक किंवा दोनदा बाळंतपण झालेली गाय घ्या.
- प्रसूतीनंतर एका महिन्याच्या कालावधीनंतरची गाय खरेदी करा.
- गाय खरेदी करण्यापूर्वी, तिचे दोन्ही वेळा पूर्णपणे दूध काढा आणि ती किती दूध देते ते पहा.
- दुभत्या जनावरे खरेदी करण्याचा सर्वोत्तम काळ ऑक्टोबर आणि नोव्हेंबर मानला जातो.
- वासरू झाल्यानंतर ९० दिवसांपर्यंत जास्तीत जास्त दूध उत्पादन दिसून येते.