Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >डेअरी > दुग्ध उत्पादकांना बाजारपेठ, तर सहकारी संस्थांकडून खरेदी, केंद्र सरकारकडून नवे पाऊल 

दुग्ध उत्पादकांना बाजारपेठ, तर सहकारी संस्थांकडून खरेदी, केंद्र सरकारकडून नवे पाऊल 

Latest News Market for milk producers, procurement from cooperatives central government decision | दुग्ध उत्पादकांना बाजारपेठ, तर सहकारी संस्थांकडून खरेदी, केंद्र सरकारकडून नवे पाऊल 

दुग्ध उत्पादकांना बाजारपेठ, तर सहकारी संस्थांकडून खरेदी, केंद्र सरकारकडून नवे पाऊल 

Milk Production : केंद्रीय सहकार मंत्रालयाने सहकारी-नेतृत्वाखालील श्वेत क्रांती २.० अभियान सुरु केले असून...

Milk Production : केंद्रीय सहकार मंत्रालयाने सहकारी-नेतृत्वाखालील श्वेत क्रांती २.० अभियान सुरु केले असून...

Agriculture News : केंद्रीय सहकार मंत्रालयाने सहकारी-नेतृत्वाखालील श्वेत क्रांती २.० अभियान सुरु केले असून सहकार्याची व्याप्ती वाढवणे, रोजगारनिर्मितीला चालना देणे आणि महिलांचे सक्षमीकरण करणे हा या मागील हेतू आहे. 

पुढील पाच वर्षांत सध्याच्या पातळीच्या तुलनेत दुग्ध सहकारी संस्थांकडून होणारी दूध खरेदी ५० टक्क्यांनी वाढवणे, दुर्गम भागातील दुग्ध उत्पादकांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे आणि संघटित क्षेत्रातील दुग्ध सहकारी संस्थांचा वाटा वाढवणे हे या या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.

संपूर्ण अर्थाने, पाचव्या वर्षाच्या अखेरीस म्हणजेच २०२८-२९ पर्यंत, दुग्ध सहकारी संस्थांकडून दररोज १००७ लाख किलो दूध खरेदी होण्याची अपेक्षा आहे. हे लक्ष्य दुहेरी धोरणांद्वारे साध्य केले जाईल :

दुग्ध सहकारी संस्थांच्या कार्यक्षेत्राचा विस्तार करणे. दुग्ध सहकारी संस्थांची पोहोच अधिक व्यापक आणि सखोल करणे.

श्वेत क्रांती २.० मधील खालील उपक्रमांच्या माध्यमातून कुपोषणावर मात करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. सुमारे १ लाख २० हजार नवीन/विद्यमान दुग्ध सहकारी संस्था (DCS) / बहुउद्देशीय दुग्ध सहकारी संस्था (M-DCS) / बहुउद्देशीय प्राथमिक कृषी पतसंस्था (M-PACS) यांची स्थापना आणि  बळकटीकरण करणे.

विद्यमान दूध संकलन मार्गांचा विस्तार करून किंवा नवीन दूध संकलन मार्ग निर्माण करून या सहकारी संस्थांना दूध मार्गांशी जोडणे. या उपक्रमाअंतर्गत आतापर्यंत दुर्लक्षित राहिलेल्या भागात  ७५ हजार नवीन दुग्ध सहकारी संस्थांची स्थापना करणे प्रस्तावित असून बाजारपेठेत प्रवेश सुलभ व्हावा.. 

उत्पन्नाचे नवीन स्रोत उपलब्ध व्हावेत आणि पोषण उपलबध्दता वाढावी, यादृष्टीने सध्याच्या ४६ हजार ४२२ दुग्ध सहकारी संस्थांना अधिक कार्यक्षम करणे. दुग्धव्यवसाय क्षेत्रात सुमारे ७० टक्के महिलावर्ग कार्यरत आहे मात्र तरीही या क्षेत्राच्या असंघटित स्वरूपामुळे त्यांचे योगदान अनेकदा कमी लेखले जाते.

महिलांच्या नेतृत्वाखालील दुग्ध सहकारी संस्था या महिलांच्या सक्षमीकरणाचे एक प्रभावी साधन म्हणून पुढे आल्या आहेत. श्वेत क्रांती  2.0 अंतर्गत आतापर्यंत दुर्लक्षित राहिलेल्या प्रत्येक पंचायत/गावात दुग्ध सहकारी संस्था  स्थापन केल्याने अधिकाधिक महिला दुग्ध उत्पादकांना संघटित दुग्ध सहकारी क्षेत्रात सामावून घेता येईल आणि त्यामुळे महिलांचे सक्षमीकरण साध्य होईल.

 

Web Title : दुग्ध उत्पादकों के लिए बाज़ार: केंद्र सरकार की सहकारी समितियों के माध्यम से नई पहल

Web Summary : केंद्र सरकार की श्वेत क्रांति 2.0 का लक्ष्य सहकारी समितियों के माध्यम से दूध की खरीद को 50% तक बढ़ाना, महिलाओं को सशक्त बनाना और दूरदराज के क्षेत्रों में उत्पादकों के लिए बाजार पहुंच बनाना है। लक्ष्य 2029 तक 1007 लाख किलोग्राम दैनिक खरीद है, जिससे डेयरी क्षेत्र मजबूत होगा।

Web Title : Market for Milk Producers: Central Government's New Initiative via Cooperatives

Web Summary : The central government's White Revolution 2.0 aims to boost milk procurement by 50% through cooperatives, empowering women and creating market access for producers in remote areas. The goal is 1007 lakh kg daily procurement by 2029, strengthening the dairy sector.