Join us

Hind Kesari's bull : महाराष्ट्राच्या बैलगाडा दुनियेत ऐतिहासिक घडामोड; 'चिमण्या' बैलाची कहाणी वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 10:17 IST

Hind Kesari's bull : शंकरपटाच्या (Shankarpata's) दुनियेत एक ऐतिहासिक विक्री घडली आहे. फुलंब्री तालुक्यातील तळेगाववाडी येथील नवाब खाँ यांच्या 'चिमण्या' नावाच्या बैलाची विक्री लाख मोलाची झाली असून, पुण्यातील बैलगाडा शर्यतीचा शौकीन अमित भाडळे यांनी ही खरेदी केली आहे. वाचा सविस्तर (Hind Kesari's bull)

रऊफ शेख

शंकरपटाच्या  (Shankarpata's) दुनियेत एक ऐतिहासिक विक्री घडली आहे. फुलंब्री तालुक्यातील तळेगाववाडी येथील नवाब खाँ यांच्या 'चिमण्या' (Chimanya Bull) नावाच्या बैलाची विक्री लाख मोलाची झाली असून, पुण्यातील बैलगाडा शर्यतीचा शौकीन अमित भाडळे यांनी ही खरेदी केली आहे. (Hind Kesari's bull)

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील तळेगाव वाडी येथील चिमण्या बैलाची (Chimanya Bull) तब्बल ६४ लाख रुपयांत विक्री झाली आहे. 

बैलगाडा मालक नवाब खाँ यांच्या एका बैलासाठी पुण्याच्या अमित भाडळे या शौकीन व्यक्तीने ही किंमत मोजली आहे. पुण्यातील कासेगावमध्ये झालेल्या शंकरपट स्पर्धेत चिमण्या हिंद केसरीचा मानकरी ठरला होता. याशिवाय, १७ स्पर्धात त्याने प्रथम पारितोषिक मिळवून दिले आहे. (Hind Kesari's bull)

हौसेला मोल नाही, असे आपण नेहमीच म्हणतो. याची प्रचिती तळेगाव वाडीतील शंकरपटाच्या एका बैलासाठी पुण्याच्या शौकिनाने मोजलेल्या किमतीवरून येते. (Hind Kesari's bull)

जिल्ह्यात पहिल्यांदाच एखाद्या बैलगाडा मालकाला एका बैलासाठी ६४ लाख रुपये इतकी रक्कम मिळाली आहे. तळेगाव वाडी येथील नवाब खाँ मजीद खाँ हे मागील काही वर्षांपासून शंकर पट स्पर्धेत सहभागी होतात. (Hind Kesari's bull)

त्यांच्याकडे दोन वर्षापासून चिमण्या नावाचा बैल आहे. त्याने राज्यातील मुंबई, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर येथील बैलगाडा शर्यतींमध्ये भाग घेत आतापर्यंत १७ प्रथम, तर ६ द्वितीय पुरस्कार पटकावले आहेत. (Hind Kesari's bull)

चिमण्याची ख्याती महाराष्ट्रभर पसरलेली असून, पुणे येथील कासेगावातील शंकरपटात दिला जाणारा मानाचा हिंद केसरी पुरस्कारही त्याने पटकावला आहे.(Hind Kesari's bull)

दररोजचे खाद्य अंडी, बदाम, १० लिटर दूध

याबाबत चिमण्याचे मालक नवाब खाँ मजीद खाँ म्हणाले, आमच्याकडे शंकर पटाचे तीन बैल आहेत. त्यापैकी एक चिमण्या बैल विकला. 

त्याला ६४ लाख रुपये किंमत मिळाली, चार वर्षांपासून त्यांना दररोज १० लिटर दूध, अंडे, बदाम, उडीद डाळ, शाळू ज्वारीचा कडबा, हिरवा चारा असा आहार देत होतो. या खाद्यामुळे तो तंदुरुस्त आहे. शंकरपटाच्या अनेक शर्यती जिंकून दिल्याचे ते म्हणाले.

'राजा-सम्राट'साठी एक कोटीची बोली

नवाब खाँ यांच्याकडे आणखी एक बैलजोडी आहे. 'राजा-सम्राट' अशी त्यांची नावे आहेत. या जोडीने गेल्या एका वर्षभरात सहा ठिकाणच्या सहा शंकरपट शर्यतींमध्ये प्रथम पुरस्कार पटकावले. (Chimanya Bull)

या जोडीसाठी एका हौशी व्यक्तीने एक कोटी रुपयांची बोली लावलेली आहे; पण नवाब खान यांनाही शंकरपटाचा छंद असल्याने राजा-सम्राट विकण्यास नकार दिला.

फक्त बैलगाडा शर्यतीचा नाद

शंकरपट शर्यतीची आवड असल्याने हौसेपोटी चिमण्या बैलासाठी ६४ लाख रुपयांची किंमत मोजली. आठ दिवसांपूर्वीच चिमण्याचे मालक नवाब खाँ यांच्याकडून त्याला घेतले, असे पुण्यातील खरेदीदार अमित भाडळे यांनी सांगितले.

हे ही वाचा सविस्तर : Akola Veterinary College : अकोल्यात पशुवैद्यकीय शिक्षणाला नवा आयाम! वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीबैलगाडी शर्यतपुणेऔरंगाबाद