Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >डेअरी > Goshala : गोसेवा आयोगासाठी १२२ कोटींची तरतूद; गोशाळांना स्वावलंबनाचा नवा मार्ग

Goshala : गोसेवा आयोगासाठी १२२ कोटींची तरतूद; गोशाळांना स्वावलंबनाचा नवा मार्ग

latest news Goshala: Provision of Rs 122 crores for Goseva Aayog; New path for self-reliance for Goshalas | Goshala : गोसेवा आयोगासाठी १२२ कोटींची तरतूद; गोशाळांना स्वावलंबनाचा नवा मार्ग

Goshala : गोसेवा आयोगासाठी १२२ कोटींची तरतूद; गोशाळांना स्वावलंबनाचा नवा मार्ग

Goshala : राज्य सरकारने गोसेवा आयोगासाठी तब्बल १२२ कोटी रुपयांची तरतूद जाहीर करत मोठा निर्णय घेतला आहे. गोशाळांना स्वावलंबी करण्यासाठी गोमूत्र आणि शेणापासून विविध उत्पादने तयार करून त्यांचे ब्रँडिंग करण्याची योजना आखली आहे. गोवंश संवर्धनासोबत ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्याचा हा प्रयत्न ठरणार आहे. (Goshala)

Goshala : राज्य सरकारने गोसेवा आयोगासाठी तब्बल १२२ कोटी रुपयांची तरतूद जाहीर करत मोठा निर्णय घेतला आहे. गोशाळांना स्वावलंबी करण्यासाठी गोमूत्र आणि शेणापासून विविध उत्पादने तयार करून त्यांचे ब्रँडिंग करण्याची योजना आखली आहे. गोवंश संवर्धनासोबत ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्याचा हा प्रयत्न ठरणार आहे. (Goshala)

अविनाश मुडेगावकर

राज्यातील गोवंश संवर्धन आणि गोशाळांच्या सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र सरकारने गोसेवा आयोगासाठी तब्बल १२२ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. (Goshala)

या निधीच्या माध्यमातून गोशाळांना स्वावलंबी करण्यासाठी गोमूत्र आणि शेणापासून विविध उत्पादने तयार करण्याच्या योजना राबविण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांनी दिली.(Goshala)

मुंदडा यांनी सांगितले की, गोवंश रक्षा आणि शेतकऱ्यांचे सक्षमीकरण या दोन उद्दिष्टांवर आयोगाचा भर आहे. भाकड झालेल्या गायी कत्तलखान्याकडे जाऊ नयेत यासाठी थेट शेतकऱ्यांशी संवाद साधून आर्थिक मदत दिली जात आहे.

गेल्या चार वर्षांत सुमारे साडेपाच कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले असून, या उपक्रमातून ५, २०० हून अधिक गोवंशाचे प्राण वाचविण्यात यश आले आहे.

गोमूत्र-शेणापासून उत्पादने

राज्यातील गोशाळांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी गोमूत्र आणि शेणापासून विविध उत्पादने तयार करून त्यांचे ब्रँडिंग करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. सेंद्रिय शेतीसाठी खत, कीटकनाशके, तसेच इतर उपयुक्त उत्पादने तयार करून बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा आयोगाचा प्रयत्न आहे.

‘गो-काष्ठ’चा पर्याय

पर्यावरणपूरक अंत्यविधीसाठी लाकडांऐवजी शेणापासून तयार केलेल्या ‘गो-काष्ठ’चा वापर वाढविण्याचा प्रस्तावही पुढे आला आहे. या संकल्पनेमुळे झाडांची तोड कमी होऊन पर्यावरण संरक्षणास हातभार लागेल, तसेच गोशाळांना अतिरिक्त उत्पन्नाचा स्रोत मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

गोसेवा आयोगाच्या माध्यमातून केवळ गोवंश संवर्धनच नव्हे, तर ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे मुंदडा यांनी स्पष्ट केले. सेवा, अध्यात्म आणि सामाजिक बांधिलकी यांचा समतोल राखत कार्यकर्त्यांनी जनतेत विश्वास निर्माण करावा, असे आवाहनही त्यांनी केले.

हे ही वाचा सविस्तर :Milk Revolution 2.0 : दूध व्यवसायात मोठी क्रांती; 'श्वेत क्रांती २.०'ने बदलणार ग्रामीण चित्र? वाचा सविस्तर

Web Title : महाराष्ट्र गोशालाओं को सशक्त बनाने के लिए ₹122 करोड़ आवंटित करेगा।

Web Summary : महाराष्ट्र सरकार ने गोसेवा आयोग के लिए ₹122 करोड़ आवंटित किए, जिसका उद्देश्य गोशालाओं को सशक्त बनाना है। गोबर और मूत्र से उत्पादों के माध्यम से आत्मनिर्भरता पर ध्यान केंद्रित किया गया है। पहल ग्रामीण अर्थव्यवस्था को बढ़ावा देने के लिए किसानों को वित्तीय सहायता प्रदान करती है।

Web Title : Maharashtra allocates ₹122 crore to empower cow shelters, promote self-reliance.

Web Summary : Maharashtra government allocates ₹122 crore for Goseva Ayog, aiming to empower cow shelters. Focus is on self-reliance through products from cow dung and urine. The initiative also provides direct financial aid to farmers to prevent cattle slaughter, promoting rural economy.