Gay Mhais Kasdah : गाय आणि म्हशींमध्ये कासदाह (Mastitis) हा आजार होतो. कासदाह म्हणजे कासेला (दुग्धग्रंथीला) होणारी सूज. हा आजार गाई-म्हशींसाठी एक गंभीर समस्या आहे, कारण यामुळे दूध उत्पादन घटते आणि जनावरांचे आरोग्य देखील बिघडते.
कासदाह प्रतिबंध व आरोग्य व्यवस्थापन
- पावसात गोठा ओला असल्याने गाई, म्हशी बसतात, त्या जागेत जिवाणूचा प्रादुर्भाव जास्त असतो.
- मुक्त गोठ्यामध्ये बाहेरील मोकळ्या जागेत चिखल होऊन पाणी साठू शकते, अशा वेळी गाई, म्हशींना कासदाह होऊ शकतो.
- यामुळे सड कायमस्वरूपी खराब होण्याची शक्यता असते.
- हा धोका टाळण्यासाठी गोठ्यामध्ये कोळशाच्या राखेचा बेड करावा.
- दूध काढण्याअगोदर आणि नंतर जंतुनाशक द्रावणाने कास स्वच्छ करावी.
- आहारात झिंक या खनिजाचे प्रमाण वाढवावे.
- जनावरांना कोरड्या जागेत बसू द्यावे.
- पोटात आम्लता होऊ न दिल्याने जनावरे आजारी पडत नाहीत.
- जनावर आजारी पडून उपचार करण्यापेक्षा नेहमी प्रतिबंधात्मक उपाय योजावेत.
- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन केंद्र, इगतपुरी
Lumpy Skin Disease : जनावरांमध्ये लम्पी रोग कसा पसरतो? जाणून घ्या सविस्तर