Agriculture News : अलीकडे दूध व्यवसाय मोठ्या प्रमाणावर वाढू लागला आहे. म्हणूनच शेतकरी गायी, म्हशींची संख्या वाढवण्यावर भर देत आहेत. गाय, म्हशींच्या माध्यमातून चांगले उत्पन्न मिळते. गायीपासून वासरू, म्हशीपासून रेडकू शिवाय दूधही मिळत असल्याने ते फायदेशीर ठरते.
परंतु गाय किंवा म्हैस गाभण असल्यास योग्य काळजी घेणे आवश्यक असते. या काळात नेमकी गायीची अवस्था कशी करते, काय काळजी घेतली पाहिजे, हे समजून घेऊयात....
गाभण गाईचे आरोग्य
- गाभण काळात गाईची रोगप्रतिकारक शक्ती कमी झालेली असते.
- तसेच व्यायल्यानंतर चिकाद्वारे वासराला रोगप्रतिकारक शक्ती देण्यासाठी गाईच्या शरीरात विविध रोगांविरुद्ध अँटिबॉडीज तयार होणे आवश्यक असते.
- अनेक पशुपालक गाभण काळात गाईंचे लसीकरण करून घेत नाहीत.
- परंतु गाभण काळातसुद्धा लस उत्पादक कंपनीच्या मार्गदर्शक सूचनेनुसार लसीकरण करावे.
- जेणेकरून गाईच्या शरीरात विविध रोगांविरुद्ध रोगप्रतिकारशक्ती निर्माण होऊन, ती कालवडीला चिकाद्वारे मिळू शकेल.
- काही प्रकारचे जंत गर्भाशयातच कालवडीला प्रादुर्भाव करतात.
- गाभण काळात सातव्या महिन्यात गाईला जंत निर्मूलन करून घ्यावे, जेणेकरून त्यांच्या प्रदुर्भावास अटकाव होईल.
- यासाठी गाभण काळात सुरक्षित असणारी व सर्व प्रकारच्या जंतांवर प्रभावी औषधांचा वापर वजनानुसार आणि पशुवैद्यकांच्या सल्ल्याने करावा.
- गोचीड, उवा, पिसवा इत्यादी बाह्यपरोपजीवींचे नियंत्रण करावे.
- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन केंद्र, इगतपुरी
