Agriculture News : काही दिवसांनंतर पावसाचे (Rainy Season) दिवस सुरु होतील. अशावेळी जनावरांना बांधणी गोठ्यात करावी लागेल. जेणेकरून पावसापासून जनावरांचे (Dairy Farming) योग्यरीत्या संरक्षण होईल. अशावेळी जनावरे बांधणीसाठी लाकडाचे खुट्टे न करता टायरचे खुट्टे बेस्ट राहतील, कारण लाकडाचे खुट्टे खराब होतील, पण हे खुट्टे खराब होणार नाहीत.
आता उन्हाचे दिवस असल्याने जनावरे बाहेरच झाडाखाली दावणीला बांधलेली असतात. पण पावसाळ्यात चांगला गोठा तयार करून घ्यावा लागतो. या गोठ्यात बांधणीसाठी खुट्टेही चांगले असावे लागतात. साधारपणे लाकडाचे एक-दोन फुटाचे खुट्टे जमिनीत बुजविले जातात. त्यालाच जनावरे बांधली जातात.
शिवाय अनेक शेतकरी लोखंडाचे खुट्टेही तयार करून घेतात. पण यासाठी सिमेंट, वाळू आदींचा खर्च होतो. पण जर तुम्ही टायरचे खुट्टे केले तर... होय, आपल्या मोटारसायकलच्या जुन्या टायरापासून टिकाऊ खुट्टे तयार करता येतील.
कस करायच हे जुगाड...
- मोटर सायकलचे जुने टायर आणायचे अन् टिकावाने एक फूट खड्डा खोदायचा.
- यानंतर खोदलेल्या खड्ड्यात अर्धा तयार ठेवावा.
- खड्ड्यात अर्धा टायर उभा केल्यांनतर त्यावर लोखंडी गजाचे तुकडे टाकायचे.
- यानंतर खोदलेल्या खड्ड्यातून निघालेल्या मातीसह दगडगोट्याने तो खड्डा भरून काढावा.
- म्हणजे अर्धा टायर खड्ड्यात अर्धा टायर वर राहील.
- अशा पद्धतीने कमी वेळेत, टाकाऊ पासून टिकावू असे जुगाड करता येईल.