Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >डेअरी > Gir Cow : गिर गायींची संख्या वाढवण्यासाठी महत्वपूर्ण निर्णय, वाचा सविस्तर 

Gir Cow : गिर गायींची संख्या वाढवण्यासाठी महत्वपूर्ण निर्णय, वाचा सविस्तर 

Latest News Dairy Farming Important decision to increase the number of Gir cows, read in detail | Gir Cow : गिर गायींची संख्या वाढवण्यासाठी महत्वपूर्ण निर्णय, वाचा सविस्तर 

Gir Cow : गिर गायींची संख्या वाढवण्यासाठी महत्वपूर्ण निर्णय, वाचा सविस्तर 

Gir Cow : ज्यांच्याकडे त्या आहेत, ते फक्त दोन ते चार गायी पाळतात. गीर गायींची संख्या वाढवण्यासाठी नवीन उपक्रम सुरू करण्यात आला आहे. 

Gir Cow : ज्यांच्याकडे त्या आहेत, ते फक्त दोन ते चार गायी पाळतात. गीर गायींची संख्या वाढवण्यासाठी नवीन उपक्रम सुरू करण्यात आला आहे. 

Gir Cow :  राजस्थानमध्ये गीर गायींचे पालन करणे सोपे आहे. राजस्थानच्या वातावरणात गीर गायी आरामात वाढतात. असे असूनही राजस्थानमध्ये गीर गायींची संख्या कमी आहे. ज्यांच्याकडे त्या आहेत, ते फक्त दोन ते चार गायी पाळतात. राजस्थानमध्ये गीर गायींची संख्या वाढवण्यासाठी एक नवीन उपक्रम सुरू करण्यात आला आहे. 

राजस्थानमधील अविकानगर येथील केंद्रीय मेंढी आणि लोकर संशोधन संस्था (CSWRI) आणि उत्तर प्रदेशातील मेरठ येथील केंद्रीय पशु संशोधन संस्था (Central Cattle Research Institute) गायींची संख्या वाढवण्यासाठी एकत्रितपणे काम करत आहेत. गेल्या वर्षी दोन्ही संस्थांमध्ये एक सामंजस्य करार झाला होता.

या योजनेअंतर्गत, दोन्ही संस्था संयुक्तपणे गोपालकांना गीर बैलांचे सीमेन पुरवठा करणार आहेत. या उपक्रमाचा फायदा अशा गोपालकांना होईल, ज्यांच्याकडे दोन ते चार गीर गायी आहेत, त्यांची संख्या वाढविता येणार आहे.

तर तुम्हाला याचा फायदा होऊ शकतो.
मेरठ पशु संशोधन संस्थेकडून गिर बैलांचे सीमेनची स्ट्रॉ राजस्थानला येत आहेत. ते CSWRI प्रयोगशाळेत योग्यरित्या जतन केले जात आहेत. सुरुवातीला, ही योजना फक्त टोंक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाच देण्यात येत होती. टोंकमधील ज्या पशुपालकांकडे आधीच गिर गायी होत्या, त्यांना याचा फायदा झाला. या परिसरात गीर गायीची संख्या वाढली. आता, राजस्थानमधील सर्व पशुपालकांना या योजनेचा फायदा होऊ शकतो. 

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होईल.
संस्थेच्या मते, या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना दुहेरी फायदा होत आहे. पहिले म्हणजे, त्यांना गिर गायींपासून चांगले आणि जास्त दूध मिळत आहे. गिर गायीच्या दुधापासून बनवलेल्या तूपालाही बाजारात जास्त मागणी आहे. यामुळे चांगले उत्पन्न मिळेल. शिवाय, गिर गायींपासून तयार होणाऱ्या मादी वासरांनाही पुढे जाऊन चांगल्या दराने विक्री करता येते. 

Web Title : राजस्थान में गिर गायों की आबादी बढ़ाने की पहल

Web Summary : राजस्थान गिर गायों की आबादी बढ़ाने के लिए काम कर रहा है। एक संयुक्त पहल किसानों को गिर बैल का वीर्य प्रदान करती है, जिससे दूध उत्पादन और मूल्यवान मादा बछड़ों के माध्यम से उनकी आय दोगुनी होने की संभावना है। यह योजना, जो शुरू में टोंक के लिए थी, अब राजस्थान के सभी किसानों को लाभान्वित करती है।

Web Title : Rajasthan Initiative Aims to Boost Gir Cow Population Significantly

Web Summary : Rajasthan is working to increase its Gir cow population. A joint initiative provides Gir bull semen to farmers, potentially doubling their income through increased milk production and valuable female calves. The scheme, initially for Tonk, now benefits all Rajasthan farmers.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.