Gayi-Mhashi Chara : ऊन वाढत असून अशा परिस्थितीत जनावरे (Gayi Aahar) अधिकाधिक पाणी पितात. शिवाय आहारावर देखील लक्ष ठेवावे लागते. दुभत्या गाई-म्हशींसाठी चारा व्यवस्थापन करण्यासाठी, त्यांच्या अवस्थेनुसार संतुलित आहाराचे योग्य नियोजन करावे लागते. या लेखातून दुभत्या गाई म्हशींचे खाद्य चारा व्यवस्थापन (Chara Vyavsthapan) कसे करावे, हे समजून घेऊयात....
दुभत्या गाई-म्हशींचे खाद्य आणि चारा व्यवस्थापन
- जनावरांच्या व्यवस्थापनावरील एकूण खर्चापैकी सुमारे ७० ते ७५ टक्के खर्च हा खाद्य आणि चाऱ्यावर होतो.
- गाई-म्हशींना त्यांचे वजन, दूध उत्पादनाप्रमाणे व दूध उत्पादनाच्या स्थितीप्रमाणे सर्व खाद्य घटक मिळाले पाहिजेत.
- पशुखाद्यातील प्रथिने, स्निग्ध पदार्थ, तंतुमय पदार्थ, कर्बोदके, एकूण खनिजे इ. घटकांचे प्रमाण दूध उत्पादनानुसार ठेवावे.
- यासाठी आपल्या गोठ्यातील जनावरांचे विभाजन करावे.
- सर्व जनावरांना सारखेच पशुखाद्य दिल्यास खर्चही वाढतो.
- पोषण व्यवस्थित मिळणार नाही, म्हणून गोठ्यातील जनावरांचे गट पाडावेत.
- यामध्ये ताज्या विलेल्या (पहिले ३ महिने), मधील काळातील (विल्यानंतर ३ ते ६ महिने व नुकत्याच गाभण झालेल्या), उशिरापर्यंतच्या काळातील (विल्यानंतर ६ ते ९ महिने व गाभण), भाकड (विण्यासाठी शेवटचे ३ महिने बाकी असलेल्या) अशा पद्धतीने विभाजन करावे.
- संतुलित पशुखाद्य तयार करण्यासाठी पशुआहार तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.
- जनावरांना त्यांच्या वजनाच्या ३ ते ३.५ टक्के चारा व खाद्य (कोरड्या पदार्थ स्वरूपात) द्यावे.
- सुमारे ४०० ते ५०० किलो वजन आणि १५ ते २० लिटर दूध देणाऱ्या गाईला सुमारे ६ ते ७ किलो पशुखाद्य किंवा आंबोण (घरगुती प्रकारचे सरकी, मकाचुनी व इतर कच्चा माल एकत्र करून तयार केलेले पशुखाद्य) विभागून दोनवेळेस द्यावे.
- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन केंद्र, इगतपुरी