Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >डेअरी > आता सरोगेट आईनंतर चक्क सरोगेट गायीसुद्धा येणार, ईटीटी-आयव्हीएफ कसे केले जाते? 

आता सरोगेट आईनंतर चक्क सरोगेट गायीसुद्धा येणार, ईटीटी-आयव्हीएफ कसे केले जाते? 

Latest news cow will become a surrogate mother through ETT-IVAF biotechnology | आता सरोगेट आईनंतर चक्क सरोगेट गायीसुद्धा येणार, ईटीटी-आयव्हीएफ कसे केले जाते? 

आता सरोगेट आईनंतर चक्क सरोगेट गायीसुद्धा येणार, ईटीटी-आयव्हीएफ कसे केले जाते? 

Surrogate Cows : असाच आविष्कार ईटीटी-आयव्हीएएफ जैवतंत्रज्ञानाच्या माध्यमातून गायीवरसुद्धा करणे शक्य झाले आहे.

Surrogate Cows : असाच आविष्कार ईटीटी-आयव्हीएएफ जैवतंत्रज्ञानाच्या माध्यमातून गायीवरसुद्धा करणे शक्य झाले आहे.

- जितेंद्र ढवळे
नागपूर : ज्या दाम्पत्याला स्वतः गर्भधारणा करणे शक्य नसते त्यांच्यासाठी दुसरी महिला गर्भधारणा करते. तिला सरोगेट मदर (आई) म्हणतात! असाच आविष्कार ईटीटी-आयव्हीएएफ (ETT IVEF) जैवतंत्रज्ञानाच्या माध्यमातून गायीवरसुद्धा करणे शक्य झाले आहे. यामुळे अधिक दुग्ध उत्पादनवाढीसाठी उच्च दर्जाचे वासरू जन्माला घालणे शक्य झाले आहे.

दुग्ध उत्पादनात विदर्भ आजही पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत मागे आहे. ही तफावत दूर व्हावी यासाठी केंद्र सरकारचे राष्ट्रीय गोकुळ मिशन आणि महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या मदतीने नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालयात उभारण्यात आलेल्या भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञान (ईटीटी) आणि कृत्रिम परिवेषीय निषेचन (आयव्हीएफ) प्रयोगशाळेत हा आविष्कार साकारल्या जातोय.

या प्रयोगशाळेच्या माध्यमातून दुग्ध उत्पादनाची उच्च अनुवांशिकता असलेल्या साहिवाल, गीर, गवळाऊ, डांगी आणि देवनी या देशी गोवंशाच्या गार्गीचे पुनरुत्पादन केले जात आहे. या अंतर्गत आतापर्यंत ७२ निरोगी सृदृढ वासरे जन्माला आली आहेत.

ईटीटी-आयव्हीएफ म्हणजे काय, ते कसे केले जाते? 
१ देशी गोवंशाचे संवर्धन व दूध उत्पादनात गुणात्मक वाढ साधण्यासाठी इन विट्रो फर्टिलायझेशन (आयव्हीएफ) आणि त्यावर आधारित एम्ब्रियो ट्रान्सफर टेक्नॉलॉजी (ईटीटी) या तंत्रज्ञानाचा वापर हा गोपालन क्षेत्रात केला जात आहे. या जैवतंत्रज्ञानात उच्च दुग्ध उत्पादन क्षमता असणाऱ्या देशी गोवंशाच्या दाता गायीच्या गर्भाशयाच्या बिजांडावरील बीजकोषातून स्त्री बीजे अल्ट्रासोनोग्राफीच्या मदतीने एका नलिकेतून शोषून घेतले जातात.

यानंतर भ्रूण प्रत्यारोपण प्रयोगशाळेत या स्त्री बिजांना एका विशिष्ट वातावरणात परिपक्व करून स्त्री बिजांचे पुरुष विजाद्वारे म्हणजेच शुक्रानूद्वारे प्रयोगशाळेत फलन केले जाते. यातून निर्माण झालेला भ्रूण (टेस्ट ट्यूब बेबी) आठ दिवस प्रयोगशाळेत वाढवून प्रत्यारोपणासाठी तयार केला जातो. हा तयार झालेला भ्रूण कमी दुग्ध उत्पादन क्षमता असणाऱ्या गायीच्या गर्भाशयात विना शस्त्रक्रिया प्रत्यारोपित करण्यात येतो.

नव्या जैवतंत्रज्ञाद्वारे काय शक्य झाले आहे?
या जैवतंत्रज्ञानात एका दाता गायीपासून महिन्यातून दोन वेळा स्त्री बीज संकलन केले जाते. एकावेळी एका दाता गायीपासून सरासरी १० ते १५ स्त्री बिजाचे संकलन होऊन यापासून सरासरी ७ ते ८ भ्रूणाची निर्मिती होते. अशा प्रकारे महिन्यातून सरासरी १४ ते १६ आणि वर्षातून १६० ते १२० भ्रूणाची निर्मिती आयव्हीएफ तंत्रज्ञानातून करता येते.

यातून वर्षाला एका दाता गायीपासून २० वासरांची निर्मिती करणे शक्य असल्याची माहिती नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. दिलीपसिंह रघुवंशी, डॉ. मनोज पाटील, डॉ. अजय गावंडे यांनी सांगितली.

कुठे होतोय हा प्रयोग ?
माफसूच्या भ्रूण प्रत्यारोपण प्रयोगशाळेमार्फत नागपूर पशुवैद्यक महाविद्यालयाच्या पशुधन प्रक्षेत्र, वडसा येथील वळू माता संगोपन केंद्र, देवलापार येथील गो-विज्ञान अनुसंधान केंद्र आदी ठिकाणी आतापर्यंत भ्रूण प्रत्यारोपणाचे प्रयोग करून १५८ गायींमध्ये आयव्हीएफद्वारे गर्भधारणा झाली असून ७२ निरोगी वासरे जन्माला आली आहेत.

भविष्यात केवळ कालवडीची निर्मिती
येत्या काळात लैंगिक वर्गीकृत वीर्याचा (सेक्स सॉर्टेड सिमेन) वापर करून केवळ मादी वासरांची (कालवड) करण्यावर विद्यापीठाचे संशोधन सुरू आहे. यामुळे विदर्भातील दुग्ध उत्पादनवाढीला मदत होणार आहे.

एका गायीपासून रोज १५ ते २० लिटर दुग्ध उत्पादन शक्य
या प्रक्रियेद्वारे गर्भधारणा झालेल्या गायीत गर्भधारणेचा निश्चित कालावधी पूर्ण झाल्यानंतर कमी दुग्ध उत्पादन क्षमता असलेली गाय उच्च दुग्ध उत्पादन क्षमता असलेल्या वासराला जन्म देते. असे जन्माला आलेले वासरू (कालवड) वयात येऊन नैसर्गिक गर्भधारणेनंतर रोज कमीत कमी १५ ते २० लिटर दुग्ध उत्पादन देऊ शकते.

Web Title : अब सरोगेट गायें भी संभव: ईटीटी-आईवीएफ से दूध उत्पादन में वृद्धि

Web Summary : सरोगेट माताओं की तरह, ईटीटी-आईवीएफ तकनीक अब सरोगेट गायों को सक्षम करती है। इससे उच्च गुणवत्ता वाले बछड़ों के उत्पादन से दूध उत्पादन में वृद्धि होती है। नागपुर का पशु चिकित्सा महाविद्यालय ईटीटी और आईवीएफ का उपयोग देशी नस्लों पर करता है, जिसके परिणामस्वरूप स्वस्थ बछड़े पैदा होते हैं और उन्नत प्रजनन तकनीकों के माध्यम से विदर्भ में दूध की उपज बढ़ाने का लक्ष्य है।

Web Title : Surrogate Cows Now Possible: ETT-IVF Boosts Milk Production

Web Summary : Like surrogate mothers, ETT-IVF technology now enables surrogate cows. This boosts milk production by producing high-quality calves. Nagpur's veterinary college uses ETT and IVF on indigenous breeds, resulting in healthy calves and aiming for increased milk yields in Vidarbha through advanced reproductive techniques.