Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >डेअरी > Conservation of Cows : देशी गाईंचं संवर्धन : शेती, उत्पन्न आणि आरोग्याचं अष्टपैलू साधन

Conservation of Cows : देशी गाईंचं संवर्धन : शेती, उत्पन्न आणि आरोग्याचं अष्टपैलू साधन

latest news Conservation of Cows: Conservation of indigenous cows: A versatile tool for agriculture, income and health | Conservation of Cows : देशी गाईंचं संवर्धन : शेती, उत्पन्न आणि आरोग्याचं अष्टपैलू साधन

Conservation of Cows : देशी गाईंचं संवर्धन : शेती, उत्पन्न आणि आरोग्याचं अष्टपैलू साधन

Conservation of Cows : भारत हा कृषिप्रधान देश असून, गोपालन हे केवळ परंपरा नसून शेतकऱ्याच्या समृद्धीचं प्रभावी साधन आहे. गाईतून दूध, शेणखत, गोमूत्र, वाहतूक, शेतीसाठी मदत अशा अनेक उपयोगांमुळे ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम बनते. आधुनिक तंत्रज्ञान, जातिवंत गोवंश, दुग्ध व्यवसाय आणि जैविक खत निर्मितीचा समन्वय साधल्यास शेतकरी दुहेरी फायदा मिळवू शकतो. राज्य शासनही 'देशी गोवंश संवर्धन दिना'द्वारे या उपक्रमाला चालना देत आहे. (Conservation of Cows)

शेअर :

Join us
Join usNext

Conservation of  Cows : भारत हा कृषिप्रधान देश असून, गोपालन ही संस्कृती व अर्थव्यवस्थेची शाश्वत आधारशिला आहे. शेती, पशुधन यांचे परस्परसंबंध कायम आहेत. (Conservation of  Cows)

गोवंशातून दूधच नाही तर शेतीसाठी लागणारी मेहनतीची कामे, वाहतूक, शेणखत, गोमूत्र आदी उपयुक्त बाबी उपलब्ध होतात. शेण, मलमूत्र आणि चाऱ्याचे अवशेष कुजवून तयार होणारं जैविक खत जमिनीच्या आरोग्यास पोषक ठरते. त्यामुळे गोपालन हे केवळ परंपरा नसून शेतकऱ्याच्या समृद्ध जीवनाचे साधन आहे.(Conservation of  Cows)

व्यावसायिक दृष्टिकोनातून उपाय गरजेचे आहेत

गोवंशाचे ग्रेडिंग अप करून जातिवंत वळूपासून गर्भधारणा करणे. मोकळ्या गोठ्यांमध्ये हवेशीर जागा, चारा-पाणी व फिरण्याची मुभा असावी. जनावरांना प्रक्रियायुक्त कोरडा व हिरवा चारा योग्य प्रमाणात द्यावा.

गावपातळीवर गायींचे होस्टेल उभारून सामूहिक दुग्धव्यवसाय करावा. स्थानिक शेतकऱ्यांनी वैरण पीक पिकवून त्याची पुरवठा साखळी उभारावी. सरकी ढेपऐवजी चांगले दर्जाचे पशुखाद्य द्यावे. 

दुग्ध व्यवसायाचे वेळापत्रक लक्षात घेऊन शेती व गोपालन यांचा समतोल राखावा. गावातच दुग्ध पदार्थ निर्मिती आणि विक्री करणे फायदेशीर ठरेल. गांडूळ खत निर्मितीचा पर्याय शेतीच्या समृद्धीस पूरक ठरेल.

जातिवंत गोवंशाची पिढी तयार करून विक्रीतूनही अर्थार्जन शक्य आहे. या विषयावरील व्यापक जनजागृतीसाठी राज्य शासनाने '२२ जुलै शुद्ध देशी गोवंश संवर्धन दिन' साजरा केला. 

गावागावांत मार्गदर्शनात्मक कार्यक्रमांचे आयोजन सुरू आहे. देशी गाींचे जतन, उत्पादनक्षमता वृद्धिंगत करणे, आधुनिक तंत्रज्ञान वापरणे, ग्राहकांना जनजागृती करणे व बाजारपेठ उपलब्ध करून देणे, हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.

(-  डॉ. किशोर बिडवे, जनसंपर्क अधिकारी, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला)

हे ही वाचा सविस्तर : Cow Day : गोमातेचा सन्मान : आता प्रत्येक वर्षी २२ जुलैला गायींसाठी विशेष दिन वाचा सविस्तर

Web Title: latest news Conservation of Cows: Conservation of indigenous cows: A versatile tool for agriculture, income and health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.