Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >डेअरी > Goat Farming  : शेळीपालन व्यवसायातील प्रजनन आणि पैदास व्यवस्थापन, वाचा सविस्तर 

Goat Farming  : शेळीपालन व्यवसायातील प्रजनन आणि पैदास व्यवस्थापन, वाचा सविस्तर 

Latest News Breeding and production management in goat farming business, read in detail | Goat Farming  : शेळीपालन व्यवसायातील प्रजनन आणि पैदास व्यवस्थापन, वाचा सविस्तर 

Goat Farming  : शेळीपालन व्यवसायातील प्रजनन आणि पैदास व्यवस्थापन, वाचा सविस्तर 

Goat Farming  :

Goat Farming  :

शेअर :

Join us
Join usNext

Goat Farming  : शेळी पालन व्यवसायामध्ये प्रजनन आणि पैदास व्यवस्थापन (Goat Farming) महत्वाचे असते. यामध्ये वेगवगेळ्या पद्धती अवलंबविल्या जातात. यामध्ये बाहय प्रजनन (Outbreeding), अंतर्गत प्रजनन (Inbreeding), उत्तोरोत्तर प्रगती पद्धत (ग्रेडींग/Grading) आणि संकरित प्रजनन (Cross Breeding) पद्धतीचा वापर केला जातो. आता याबाबत थोडं सविस्तर जाणून घेऊयात... 

आता प्रदेशानुसार शेळ्यांच्या वेगवगेळ्या जाती पाहायला मिळतात. शिवाय शेळ्यांच्या अनुवांशिकतेतही भिन्नता आढळते. त्यामुळे पैदाशीकरिता निवड पद्धतीचा अवलंब करता येतो. पशुपालकांच्या गरजेनुसार योग्य त्या प्रजनन प्रणालीचा अवलंब करू शकतो.

प्रचलित प्रजनन पद्धती

ब) मुक्त पद्धत : 

तोटे : 

  • बोकडाचे खाण्यावर लक्ष रहात नाही. त्यामुळे बोकडाची प्रकृती खालावते, वजन कमी होते.
  • पूर्ण कळप अस्थिर होतो.
  • दोन बलवान बोकडांमध्ये लढाईचे प्रसंग उद्भवतात.
  • वंशावळीसंबंधी माहिती ठेवता येत नाही.
  • विताचे नियोजन करता येत नाही.

 

ब) मर्यादित मुक्त पद्धत 
शेळया दिवसा चरून आल्यावर मोठ्या कळपाचे सांयकाळी २५-३० शेळ्यांचे लहान गट करून प्रत्येक गटामध्ये एक बोकड फक्त रात्रीच मोकळा सोडला जातो.

क) नियंत्रित प्रजनन पद्धत
माजावरील शेळ्या नसबंदी केलेल्या बोकडाच्या सहाय्याने निवडून वेगळया केल्या जातात.
वैयक्तिकरित्या नैसर्गिक पद्धतीने अथवा कृत्रिम रेतन पद्धतीने भरविल्या जातात.


- डॉ. सचिन टेकाडे, सहाय्यक संचालक, महाराष्ट्र शेळी व मेंढी विकास महामंडळ 

Web Title: Latest News Breeding and production management in goat farming business, read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.