Gopal Ratna Pusrakar : दुग्धव्यवसाय आणि पशुसंवर्धन क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याची दखल घेण्यासाठी राष्ट्रीय गोपाळ रत्न पुरस्कार जाहीर केले जातात. यंदा महाराष्ट्रातील डेअरी क्षेत्रात काम करणाऱ्या दोघांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. हे पुरस्कार ५ लाख ते १ लाख रुपयांपर्यंत आहेत.
मंत्रालयाने जाहीर केलेल्या यादीनुसार, देशभरातील एकूण १५ व्यक्तींना गोपाळ रत्न पुरस्कार मिळतील. या पुरस्कारांमध्ये प्रथम क्रमांकासाठी ५ लाख, दुसऱ्या क्रमांकासाठी ३ लाख, तिसऱ्या क्रमांकासाठी २ लाख आणि ईशान्येकडील प्रदेशासाठी २ लाख रुपयांचा विशेष पुरस्कार समाविष्ट आहे.
एकूण २,०८० अर्जांमधून १५ व्यक्तींची निवड करण्यात आली. २६ नोव्हेंबर रोजी नवी दिल्ली येथे एका समारंभात केंद्रीय पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री हे पुरस्कार प्रदान करतील.
देशी गायी/म्हशींच्या जातींचे संगोपन करणारा सर्वोत्तम दुग्ध उत्पादक शेतकरी
- प्रथम : अरविंद यशवंत पाटील, कोल्हापूर, महाराष्ट्र.
- द्वितीय : कंकनाला कृष्णा रेड्डी, हैदराबाद, तेलंगणा
- तृतीय (विभागून) : सुरभी सिंग, बिजनौर, उत्तर प्रदेश, श्रद्धा सत्यवान धवन, अहिल्यानगर, महाराष्ट्र.
सर्वोत्कृष्ट डेअरी सहकारी संस्था/दूध उत्पादक कंपनी/डेअरी फार्मर उत्पादक संस्था
- प्रथम : मीनन गाडी क्षीरोलपदका सहकारणा संघम लिमिटेड, वायनाड, केरळ.
- द्वितीय (विभागून) : कुन्नमकट्टुपथी क्षीरोलपदक सहकारणा संघम, पलक्कड, केरळ आणि घिनोई दुग्ध उत्पादक सहकारी समिती, जयपूर, राजस्थान.
- तृतीय : सेंदुराई दूध उत्पादक सहकारी संस्था लिमिटेड, अरियालूर, तामिळनाडू.
सर्वोत्कृष्ट कृत्रिम रेतन तंत्रज्ञ (AIT)
- प्रथम : दिलीप कुमार प्रधान, अनुगुल, ओडिशा
- दुसरी : विकास कुमार, हनुमानगड, राजस्थान.
- तृतीय : श्रीमती अनुराधा चकली, नंद्याल, आंध्र प्रदेश.
या प्रमुख कॅटेगिरींसह काही विशेष पुरस्कार, उत्तेजनार्थ पुरस्कारही देण्यात आले आहेत.
