Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >डेअरी > Akola Veterinary College : अकोल्यात पशुवैद्यकीय शिक्षणाला नवा आयाम! वाचा सविस्तर

Akola Veterinary College : अकोल्यात पशुवैद्यकीय शिक्षणाला नवा आयाम! वाचा सविस्तर

latest news Akola Veterinary College: A new dimension to veterinary education in Akola! Read in detail | Akola Veterinary College : अकोल्यात पशुवैद्यकीय शिक्षणाला नवा आयाम! वाचा सविस्तर

Akola Veterinary College : अकोल्यात पशुवैद्यकीय शिक्षणाला नवा आयाम! वाचा सविस्तर

Akola Veterinary College : विदर्भातील पशुसंवर्धन शिक्षणासाठी एक ऐतिहासिक टप्पा गाठला जात असून, अकोल्यात नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालयासाठी सुसज्ज, आधुनिक सुविधा उभारल्या जाणार आहेत. वाचा सविस्तर (Akola Veterinary College)

Akola Veterinary College : विदर्भातील पशुसंवर्धन शिक्षणासाठी एक ऐतिहासिक टप्पा गाठला जात असून, अकोल्यात नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालयासाठी सुसज्ज, आधुनिक सुविधा उभारल्या जाणार आहेत. वाचा सविस्तर (Akola Veterinary College)

शेअर :

Join us
Join usNext

Akola Veterinary College : विदर्भातील पशुसंवर्धन शिक्षणासाठी एक ऐतिहासिक टप्पा गाठला जात असून, अकोल्यात नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालयासाठी सुसज्ज, आधुनिक सुविधा उभारल्या जाणार आहेत.(Akola Veterinary College)

या प्रकल्पात अत्याधुनिक प्रयोगशाळा, संशोधन केंद्र, पशुचिकित्सालय आणि विविध प्राण्यांचा समावेश असलेला लाईव्ह स्टॉक फार्म तयार होणार आहे. आज (११ जून) रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या महत्त्वपूर्ण प्रकल्पांचे भूमिपूजन करण्यात आले.(Akola Veterinary College)

२०१४ पासून प्रतीक्षेत असलेले हे महाविद्यालय २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात कार्यान्वित झाले असून, सध्या ८० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला आहे. महाविद्यालयासाठी २४९.६२ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. सध्या विद्यार्थ्यांचे वर्ग 'पशू व मत्स्य विज्ञान संस्थे'च्या इमारतीत घेतले जात आहेत.(Akola Veterinary College)

अकोल्यात पशुवैद्यकीय शिक्षणासाठी इतिहास घडणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २४९ कोटींच्या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले. सिंचन, ऊर्जा, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात तब्बल २५८८ कोटींचे विकासकामं मंजूर झाली असून विदर्भातील ग्रामीण भागासाठी सुवर्णसंधी निर्माण झाली आहे.(Akola Veterinary College)

खारपाण पट्ट्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता

अकोट आणि अकोला तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या या प्रकल्पात, ८.२४५ दशलक्ष घनमीटर पाणी साठवणूक क्षमतेचा संग्राहक जोडला जाणार आहे. या साठ्यामुळे सुमारे १८०० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे, असेही प्रशासनाकडून सांगण्यात आले.

२,५८८ कोटींच्या विविध प्रकल्पांचे भूमिपूजन व लोकार्पण

अकोला जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आराखड्यात २५८८ कोटी रुपयांचे पाणी, रस्ते, आरोग्य, ऊर्जा, पोलिसांसाठी निवास, जिल्हा प्रशासकीय इमारती, सौर ऊर्जा प्रकल्प, जलतरण तलाव, सांस्कृतिक भवन यांचा समावेश आहे. विविध उपकेंद्रांची कामे व सीसीकॅमेऱ्याच्या प्रकल्पांचे लोकार्पणही करण्यात आला.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते खालील प्रकल्पांचे उद्घाटन

* पूर्णा नदीवरील काटीपाटी बेरेज प्रकल्प (४५४.६२ कोटी)

* पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय इमारत (२४९.४१ कोटी)

* अमृत 2.0 अंतर्गत मलनिःसारण योजना (६२९.०६ कोटी)

* ई-बस डेपो व चार्जिंग स्टेशन (१८.२९ कोटी)

* रस्ते आणि महामार्ग सुधारणा (८१८ कोटी)

* पोलिस निवास प्रकल्प (१२९.२३ कोटी)

* १२ मेगावॉट सौर प्रकल्प कार्यान्वित (भेंडीमहाल - १० MW, रेडवा - २MW)

हे ही वाचा सविस्तर : Pdkv Cow : अकोल्यात सेक्स-सॉर्टेड सिमेनचा यशस्वी प्रयोग; पाहा काय आहे विशेष वाचा सविस्तर

Web Title: latest news Akola Veterinary College: A new dimension to veterinary education in Akola! Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.