Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >डेअरी > Agriculture News : नाशिक जिल्ह्यात गाय म्हशींची संख्या घटली, तर शेळी, कुक्कुटपालन दीडपट वाढलं.... 

Agriculture News : नाशिक जिल्ह्यात गाय म्हशींची संख्या घटली, तर शेळी, कुक्कुटपालन दीडपट वाढलं.... 

Latest News Agriculture News goat and poultry farming has increased in nashik district see details | Agriculture News : नाशिक जिल्ह्यात गाय म्हशींची संख्या घटली, तर शेळी, कुक्कुटपालन दीडपट वाढलं.... 

Agriculture News : नाशिक जिल्ह्यात गाय म्हशींची संख्या घटली, तर शेळी, कुक्कुटपालन दीडपट वाढलं.... 

Agriculture News : गाय, म्हैस पालनासाठी (Cow) अनुदान देऊनदेखील त्यांचे पालन करण्याचे प्रमाण कमी झाले आहे.

Agriculture News : गाय, म्हैस पालनासाठी (Cow) अनुदान देऊनदेखील त्यांचे पालन करण्याचे प्रमाण कमी झाले आहे.

शेअर :

Join us
Join usNext

नाशिक : जिल्ह्यात पशुगणना (Livestock Census) तीन दिवसांपूर्वी पूर्ण झाली असून, मागील वर्षाच्या तुलनेने पशूंची संख्या यंदा सहा टक्के घटली आहे. यात गाय व म्हशींचे प्रमाण चार टक्क्यांनी तर गाढव व घोडेदेखील संख्येने कमी आले. चहा व दुग्धजन्य पदार्थांसाठी दूध देणाऱ्या गायी, म्हशींची घटलेली संख्या चिंताजनक आहे. सरकारतर्फे गाय, म्हैस पालनासाठी (Cow) अनुदान देऊनदेखील त्यांचे पालन करण्याचे प्रमाण कमी झाले आहे.

गेल्या काही महिन्यापासून देशभरात पशुगणना (Census) सुरु होती. महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांची पशुगणना पूर्ण झाली आहे. नाशिक (Nashik District) जिल्ह्यातील २ हजार ३९७ गावांमध्ये पशुगणना झाली. यामध्ये २०१९ ला १९ लाख ३९ हजार ५६४ इतक्या गुरांची नोंदणी झाली होती. तर आताच्या जनगणनेत १८ लाख २४ हजार ६२ इतक्या गुरांची नोंदणी झाली. जिल्ह्यामध्ये शहरी भागाकरिता १६५ व ग्रामीणमध्ये ३८४ प्रगणक यांनी पशुगणना केली.

मेंढ्या वाढल्या; २०१९ ला २ लाख ४३ हजार
गाढव व घोड्यांची संख्या कमी झाली आहे. २०१९ ला ३५ हजार गाढव व घोडे होते. ते आता २२ ते २३ हजार झाले असल्याचे पशू विभागातील सूत्रांनी सांगितले. तर मेढ्यांची संख्या तीन टक्क्यांनी वाढली आहे. २०१९ ला जिल्ह्यात २ लाख ४३ हजार ३७३ मेंढ्या मोजण्यात आल्या होत्या. त्यात जवळपास ४० हजारांची वाढ झाली.

२०१९ ला इतके होते पशू
२०१९ मध्ये झालेल्या २० व्या पशुगणनेनुसार जिल्ह्यामध्ये ११ लाखांवर गायी, म्हशी, शेळी व मेंढ्या, ८ लाख २३ हजार २५ तसेच १३ लाख १५ हजार ७०० कोंबड्या होत्या. कोंबड्या सोडून इतर सर्वच पशू सहा टक्क्यांनी आताच्या पशुगणनेत कमी झाले आहेत. जिल्ह्याच्या पशुगणनेत सहा टक्के पशू कमी झाले असले तरी पोल्ट्री फार्म वाढल्याने २०१९ च्या तुलनेने दीड पट संख्या कोंबड्यांची वाढलेली असल्याचे पशू विकास अधिकाऱ्यांनी सांगितले. 

Web Title: Latest News Agriculture News goat and poultry farming has increased in nashik district see details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.