Dairy Crisis : अतिवृष्टी, चाऱ्याची कमतरता, भाकड जनावरांची वाढ आणि सहकारी दूध संस्थांची अधोगती या सर्व संकटांचा एकत्रित फटका दुग्ध व्यवसायाला बसला आहे. (Dairy Crisis)
लातूर जिल्ह्यात गायी, म्हशींची मोठी संख्या असतानाही अतिवृष्टी, वंध्यत्व, चारा टंचाई आणि सहकारी संस्थांची मोडकळलेली रचना या कारणांमुळे दूध उत्पादनात लक्षणीय घट झाली आहे. (Dairy Crisis)
मागील वर्षाच्या तुलनेत यंदा दूध संकलनात १० ते १५ टक्क्यांची घट नोंदवण्यात आली असून, चार महिन्यांत जवळपास ६६ हजार लिटर दूध कमी संकलित झाले आहे. (Dairy Crisis)
राष्ट्रीय दूध दिवसाच्या पार्श्वभूमीवर ही परिस्थिती अधिक चिंताजनक मानली जात आहे. (Dairy Crisis)
पशुधन मोठे… पण दूध उत्पादन मागे!
२० व्या पशुधन गणनेनुसार लातूर जिल्ह्यात गाय-म्हैसवर्गीय एकूण ५ लाख ११ हजार पशुधन आहे. त्यात १,४२,८८१ गायी तर २,४१,४५८ म्हशी होत्या.
सर्वाधिक पशुधन असलेले तालुके
औसा, लातूर, निलंगा, अहमदपूर, उदगीर आणि चाकूर तरीही जनावरांचे भाकड होणे, दुधाळ जनावरांची संख्या कमी असणे, पौ चाऱ्याचा अभाव, संक्रमणजन्य आजार आणि अतिवृष्टीचा प्रतिकूल परिणाम या कारणांमुळे उत्पादन अपेक्षेपेक्षा कमी राहिले.
अतिवृष्टी आणि पुराचा मोठा प्रभाव
जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे अनेक ठिकाणी जनावरे वाहून गेली किंवा दगावली.
हिरव्या चाऱ्याचे मोठे नुकसान
चाऱ्यासाठी तुटवडा
लांबलेला भाकड काळ
दुधाळ जनावरांमध्ये आजार वाढ
याचा थेट परिणाम दूध उत्पादन घटण्यावर झाला.
दूध संकलनात मोठी घसरण
| महिना | २०२४-२५ | २०२५-२६ | घट |
|---|---|---|---|
| जुलै | १,४८,९०५ | १,३३,१०६ | -१५,७९९ |
| ऑगस्ट | १,३४,९४१ | १,२६,८६८ | -८,०७३ |
| सप्टेंबर | १,५०,७९४ | १,३८,९४९ | -११,८४५ |
| ऑक्टोबर | १,८३,७५० | १,५३,५३५ | -३०,२१५ |
एकूण घट : सुमारे ६६,००० लिटर
सहकारी संस्थांची वाताहत – खाजगी डेअर्यांचा प्रभाव वाढला
जिल्ह्यातील अनेक सहकारी दूध संस्थांची अवस्था बिकट आहे.
२० संस्था केवळ नावापुरत्या
एकमेव सहकारी केंद्रातून केवळ ४७,९०७ लिटर संकलन
त्याच्या तुलनेत ११ खाजगी डेअर्यांमधून १६.५० लाख लिटर संकलन
मागील वर्षी जिल्ह्यात एकूण दूध संकलन २० लाख २४ हजार ७६३ लिटर होते. यंदा (ऑक्टोबर अखेर) फक्त १६ लाख ९८ हजार २६२ लिटर संकलन झाले.
प्रति माणसी ३०० मिली दूध गरजेचे… पण पूर्ण होत नाही गरज
राष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वांनुसार एका व्यक्तीस दररोज ३०० मिली दूध आवश्यक आहे. मात्र लातूर जिल्ह्यातील प्रत्यक्ष उपलब्धता यापेक्षा खूप कमी असल्याचे तज्ज्ञ सांगतात.
सुधारणा आवश्यक
दुधाळ जनावरांचा दर्जा सुधारण्यासाठी कृत्रिम रेतन, वंध्यत्व निवारण मोहिमा आणि जनावरांना प्रोत्साहन देणारी योजना राबविली जात आहेत.- डॉ. श्रीधर शिंदे,उपायुक्त, जिल्हा पशुसंवर्धन
डोंगराळ भाग, चाऱ्याची कमतरता आणि सहकारी संस्थांची अधोगती यामुळे दुधाचे उत्पादन घटले आहे.- महेंद्र बनसोडे, प्र. जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी
