देवराष्ट्रे : सांगली जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांत गाय दुधाच्या खरेदी दरात प्रति लिटर दोन रुपयांची वाढ झाली आहे.
गायदूध खरेदी दर ३७ रुपये झाला आहे, तर म्हैस दूध खरेदी दरात एक रुपयांची वाढ होऊन म्हशीच्या दुधाचा खरेदी दर ५३.५० रुपये झाला. त्यामुळे पशुपालकांना दिलासा मिळाला आहे.
वाढत्या उत्पादन खर्चामुळे दूध संघ आणि खासगी डेअरींकडून दरवाढ करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. यापूर्वी जिल्ह्यात गाय दुधाचा खरेदी दर सरासरी ३५ रुपये प्रति लिटर इतका होता.
मात्र मागील पंधरा दिवसांत विविध दूध संघ आणि डेअरी कंपन्यांनी दरात वाढ करून तो ३७ रुपये प्रति लिटरपर्यंत नेला आहे.
काही ठिकाणी फॅटच्या प्रमाणानुसार दर ३९ ते ४० प्रति लिटर पर्यंतही दिला जात असल्याची माहिती दूध उत्पादकांकडून मिळत आहे.
दूध उत्पादनासाठी लागणारा जनावरांचा चारा, कडबा, पशुखाद्य आणि औषधांचा खर्च वाढल्यामुळे दरवाढ आवश्यक असल्याचे डेअरी क्षेत्रातील सूत्रांनी सांगितले. त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील अनेक दूध उत्पादकांनी उत्पादन खर्चाच्या तुलनेत अजूनही दूध दर कमी असल्याचे सांगत दरात आणखी वाढ करण्याची मागणी केली आहे.
दरवाढीने उत्पादकांना दिलासा◼️ जिल्ह्यातील दरवाढीने उत्पादकांना दिलासा मिळाला असला तरी राज्यातील इतर दूध संघांचे दर हे सांगली जिल्ह्यापेक्षा दोन ते तीन रुपये प्रति लिटर जास्तच आहेत.◼️ उदाहरणार्थ, सोनाई दूध संघ गाय दूध प्रति लिटर ४१ रुपये, हेरिटेज दूध ४१ रुपये लिटर, आणि हडसन दूध ४० रुपये लिटर आहे.
जिल्ह्यात म्हैस दुधात मोठी घटज्या प्रमाणात गाई दुधाचे दर वाढत आहेत, त्या प्रमाणात म्हैस दुधाचे भाव वाढत नसल्यामुळे पशुपालकांनी म्हशीला पर्याय देत गाय पालनाकडे अधिक कल वाढवला आहे. परिणामी, जिल्ह्यात म्हशीचे दूध उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे.
अधिक वाचा: ज्वारीच्या उत्पादनात घट, दरात मात्र दुपटीने वाढ; वाचा शाळू ज्वारीला प्रतिक्विंटल काय दर?
Web Summary : Sangli district sees a rise in cow and buffalo milk procurement prices. Cow milk increased by ₹2 to ₹37/liter, buffalo milk by ₹1 to ₹53.50/liter. Farmers welcome the increase, although demand for further price hikes persists due to rising production costs. Buffalo milk production is decreasing.
Web Summary : सांगली जिले में गाय और भैंस के दूध की खरीद दरों में वृद्धि हुई है। गाय का दूध ₹2 बढ़कर ₹37/लीटर, भैंस का दूध ₹1 बढ़कर ₹53.50/लीटर हो गया है। किसानों ने इस वृद्धि का स्वागत किया है, हालांकि बढ़ती उत्पादन लागत के कारण और मूल्य वृद्धि की मांग बनी हुई है। भैंस के दूध का उत्पादन घट रहा है।