महाराष्ट्र राज्याच्या आर्थिक पाहणी (२०२४-२०२५) अहवालानुसार देशपातळीवर राज्याचा दूध उत्पादनात पाचवा क्रमांक लागतो.
गाई आणि म्हशींचे प्रजनन हे यशस्वी दुग्धव्यवसायाचे मूळ आहे. उत्तम प्रजननामुळे दूध उत्पादन वाढते, निरोगी वासरे जन्माला येतात व त्यामुळे पशुपालकांचे उत्पन्न वाढते.
प्रजनन यशस्वी होण्यासाठी जनावरांची निवड, पोषण, आरोग्य, त्यांचा माज ओळखणे, कृत्रिम रेतन, गर्भधारणेचा काळ आणि विल्यानंतरची काळजी या सर्व घटकांकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
जनावरांची निवड◼️ उत्तम प्रजननासाठी प्रथम योग्य जनावरांची निवड करणे गरजेचे आहे.◼️ कालवडी साधारण १२ ते १८ महिने वयाच्या तर वगारी २४ ते ३६ महिने वयाच्या झाल्यानंतर पैदासक्षम होतात.◼️ कालवडीचे वजन साधारण २५० किलो आणि वगारीचे ३०० किलो झाले की त्या माजावर येण्याची शक्यता अधिक असते.◼️ यासाठी पशुवैद्यकांकडून त्यांची नियमितपणे गर्भ तपासणी करणे आवश्यक आहे.◼️ गाईमध्ये प्रथम माज १५ महिन्यात आणि म्हशीमध्ये १८ महिन्यात येतो.◼️ गाईमध्ये २६ ते २८ महिन्यात पहिल्यांदा प्रसूती आणि म्हशीत ३२ ते ३६ महिन्यात होणे आदर्श मानले जाते.◼️ जन्मावेळी वासराचे वजन साधारण २५ ते ३० किलो असावे.
जातींची निवड◼️ पैदाशीसाठी गाई-म्हशींची निवड करताना जनावरांची जात, त्यांचे आरोग्य याबाबतचा इतिहास आणि पूर्वीचे प्रजनन याकडे लक्ष द्यावे.◼️ दुग्धोत्पादनासाठी उच्च दूध उत्पादन देणाऱ्या जाती जसे संकरीत होलस्टाईन-फ्रिजियन इ.◼️ देशी जातीवंत गाई जसे गिर, साहिवाल इ.◼️ प्रादेशिक वातावरणात जुळवून घेणाऱ्या गाई जसे देवणी, खिल्लार, डांगी, लाल कंधारी, गवळाऊ इ.◼️ म्हशीमध्ये मुऱ्हा, नागपुरी, पंढरपुरी, मराठवाडी म्हशी या आपल्याकडे असणाऱ्या चाऱ्याची उपलब्धतता तसेच व्यवस्थापन यानुसार निवडाव्यात.
थंडीचा काळ गर्भधारणेसाठी उत्तम◼️ वारंवार गर्भपात होणाऱ्या जनावरांची पशुवैद्यकाकडून तपासणी करून घ्यावी. ऑक्टोबर ते मार्च महिन्याचा काळ गर्भधारणेसाठी उत्तम आहे.◼️ या काळात तापमान कमी असते आणि हिरवा चारा मुबलक मिळतो, ज्यामुळे गर्भधारणेचे यश ७०-८०% पर्यंत वाढते.
- डॉ. गणेश निटूरेपशुधन विकास अधिकारीतालुका लघुपशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय, रेणापूर
अधिक वाचा: जगातील सर्वात बुटकी म्हैस म्हणून माण तालुक्यातील 'या' म्हैशीची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद