Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >डेअरी > एक रेशीम अळी ८०० ते १२०० मीटर लांबीचा धागा असणारा कोष कसा तयार करते? वाचा सविस्तर

एक रेशीम अळी ८०० ते १२०० मीटर लांबीचा धागा असणारा कोष कसा तयार करते? वाचा सविस्तर

How does a silkworm create a cocoon with a thread that is 800 to 1200 meters long? Read in detail | एक रेशीम अळी ८०० ते १२०० मीटर लांबीचा धागा असणारा कोष कसा तयार करते? वाचा सविस्तर

एक रेशीम अळी ८०० ते १२०० मीटर लांबीचा धागा असणारा कोष कसा तयार करते? वाचा सविस्तर

Sericulture रेशीम उत्पादन व्यवसायासाठी उपयुक्त असलेल्या कीटकांच्या जातीपैकी तुतीवरील रेशीम कीटक ही एक प्रमुख जात असून हजारो वर्षांच्या कृत्रिम संगोपनामुळे ती पूर्णपणे माणसाळलेली आहे.

Sericulture रेशीम उत्पादन व्यवसायासाठी उपयुक्त असलेल्या कीटकांच्या जातीपैकी तुतीवरील रेशीम कीटक ही एक प्रमुख जात असून हजारो वर्षांच्या कृत्रिम संगोपनामुळे ती पूर्णपणे माणसाळलेली आहे.

शेअर :

Join us
Join usNext

रेशीम उत्पादन व्यवसायासाठी उपयुक्त असलेल्या कीटकांच्या जातीपैकी तुतीवरील रेशीम कीटक ही एक प्रमुख जात असून हजारो वर्षांच्या कृत्रिम संगोपनामुळे ती पूर्णपणे माणसाळलेली आहे.

या अळ्यांचे संगोपन तुतींच्या पानांचे उत्पादन आणि वाढ यांच्याशी निगडित असते. हवामानानुसार वर्षातून एकदा, दोनदा किंवा अनेकदा अळ्यांचे संगोपन केले जाते.

रेशीम अळ्यांची वाढ त्यांना खाऊ घातलेल्या पानांच्या दर्जावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असते. पाने रसरशीत व गर्द हिरव्या रंगाची असायला हवीत. यासाठी बागेची काळजी घ्यायला हवी.

रेशीम कोष कसा तयार होतो?
-
अळ्यांची वाढ तुतीच्या पानांवर होते.
- तीन ते चार आठवड्यात अळींची पूर्ण वाढ होते.
- पूर्ण वाढलेली अळी पाने खाणे थांबविते.
- अळीची वाढ पूर्ण झाल्यानंतर ती कोषावस्थेत जाण्यासाठी तयारी करते. अशावेळी ती खाणे थांबविते.
- तिचा रंग बदलून ती किंचित आकुंचन पावते.
- डोक्याकडचा भाग उंचावून ती या बाजूकडून त्या बाजूकडे सावकाशपणे हलविते.
- या अवस्थेमध्ये अळी कोष करण्यासाठी तयार झाली असे समजावे.
- अशा अळ्यांना कोष नीट करता यावेत म्हणून १.८ मीटर लांब व १.२ मीटर रुंदीच्या पट्टयांपासून बनवलेल्या चक्राकार चंद्रिकेवर सोडण्यात येते.
- सध्या विविध आकाराच्या प्लास्टिक चंद्रिका उपलब्ध आहेत.
- अळी स्वतःच्या शरीराभोवती रेशमाचे आवर तयार करून त्यामध्ये कोषावस्थेत जाते.
- कोषावरणासाठी वापरला जाणारा धागा अखंड असून त्याची लांबी ८०० ते १२०० मीटर असते.
- कोषावस्था १० ते १२ दिवस टिकते.
- कोषामधून पतंग बाहेर पडण्यापूर्वीच वाफेचा किंवा इतर तंत्राचा अवलंब करून पतंग मारण्यात येतो.

एकरात हजारोंचे उत्पन्न
-
तुतीचे तसेच रेशीम कीटकांचे सुधारित वाण व नवीन विकसित केलेले कोष उत्पादन व रेशीम उद्योग तंत्रज्ञान यांचा प्रभावी वापर केल्यास एक एकर बागायतीपासून ४० ते ५० हजार रुपयांचे उत्पन्न मिळते.
- तुतीचा राहिलेला पाला, विष्ठा जनावरांसाठी चारा व सेंद्रिय खतासाठी वापर होऊ शकतो. तुती लागवड करून रेशीम कीटक संगोपनाद्वारे शेतकऱ्यांना इतर पिकाबरोबर हमखास उत्पन्न देणारे नगदी पीक आहे.

अधिक वाचा: खोरच्या युवा शेतकऱ्याचा कलिंगड उत्पादनात विक्रम; आंतरपीक म्हणून मिरचीचा यशस्वी प्रयोग

Web Title: How does a silkworm create a cocoon with a thread that is 800 to 1200 meters long? Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.