Join us

Holi2024 : होळीसाठी पाच रुपयांना एक गोवरी, आदिवासी महिलांसाठी 'गोमय गोवरी प्रकल्प' बनला रोजगार 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2024 5:04 PM

गोमय गोवरी प्रकल्पच्या माध्यमातून आतापर्यंत दीडशेहून आदिवासी महिलांना रोजगार मिळाला आहे. 

अवघ्या काही तासांवर होळीचा सण आला असून घरोघरी पुरणपोळी बनविण्याचे नियोजन सुरु आहे. दुसरीकडे अगदी जल्लोषात होळीचा सण साजरा केला जातो. होळीचा सण म्हटलं की होळी पेटवली जाते. याची वेगवगेळ्या भागात वेगवेगळी परंपरा देखील केली जाते. याच  श्री गुरुजी रुग्णालय संचलित सेवा संकल्प समिती गेल्या सात वर्षांपासून गोमय गोवरी प्रकल्प राबवत असते. या प्रकल्पच्या माध्यमातून आतापर्यंत दीडशेहून आदिवासी महिलांना रोजगार मिळाला आहे. 

होळीच्या सणाला लहान आणि मोठी होळी पेटवली जाते. यासाठी शेणापासून बनविलेल्या गोवऱ्यांच्या समावेश केला जातो. याच संकल्पनेतून श्रीगुरुजी रुग्णालय संचलित सेवा संकल्प समिती गेल्या सात वर्षांपासून गोमय गोवरी प्रकल्प राबवत असते. या प्रकल्पाचा प्रमुख उद्देश आदिवासी महिलांना रोजगार उपलब्ध करून देणे हा होय. या प्रकल्पात यंदा ३५ आदिवासी महिला जोडल्या गेल्या आहेत. गोमय गोवरी प्रकल्पाच्या माध्यमातून रोजगार मिळालेल्या या महिलांचे रोजगारासाठी होणारे स्थलांतर टळले आहे.

कशी असते गोवरी 

आदिवासी महिला आपल्या घरगुती पशुधनाच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या शेणापासून या गोवऱ्या बनवितात. ही गोवरी ९ इंच व्यास व १ इंच रुंदीची असते. एका गोवरीची किंमत 5 रुपये असते. अशा 50 गोवऱ्या मिळून पॅकिंग केले जाते. हा पॅकिंग केलेला बॉक्स 250 रुपयांना विक्री केला जातो. तसेच आगाऊ कळविल्यास बाहेर गावी घरपोच  पाठविण्याची व्यवस्था केली जाईल. नाशिकमध्ये १३ विक्री केंद्रे होळीच्या दिवशी असतील. म्हणजे आपणास आपल्या जवळच गोवरी उपलब्ध होतील, तसेच अधिक माहितीसाठी सेवा संकल्प समिती, द्वारा श्रीगुरुजी रुग्णालय, आनंदवल्ली, गंगापूर रोड, नाशिक इथे संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे. 

गेल्या सात वर्षांपासून हा उपक्रम राबविला जात आहे. मुख्यतवे आदिवासी भागात जानेवारी ते एप्रिल महिन्यात मोठ्या प्रमाणात रोजगारासाठी स्थलांतर होत असते. त्यामुळे जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, पेठ आदी आदिवासी भागातील महिलांचे स्थलांतर थांबविण्यासाठी हा उपक्रम सुरु करण्यात आला. आतापर्यंत दोनशे महिला या उपक्रमात सहभागी झाल्या असून या महिन्यातील त्यांचे स्थलांतर थांबले आहे. यंदा ३५ महिलांनी या उपक्रमात सहभागी होऊन मागील महिनाभरात जवळपास एक लाखाहून अधिक गोवऱ्या तयार केल्या आहेत. साधारण एका महिलेला पाच ते सहा रुपये इतके पैसे मिळतात. - मिलिंद जोशी, सेवा संकल्प समिती, व्यवस्थापक

पीक व्यवस्थापनापासून नियोजनापर्यंत, शेतीच्या सर्व अपडेट्ससाठी लोकमत ऍग्रोच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील व्हा... 

टॅग्स :शेतीहोळी 2024गायदुग्धव्यवसायनाशिक