lokmat Supervote 2024
Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >डेअरी > लाळ, खुरकत लसीकरण केले का? दूध उत्पादनावर होईल परिणाम...

लाळ, खुरकत लसीकरण केले का? दूध उत्पादनावर होईल परिणाम...

Have you been vaccinated against lal khurkat? Milk production will be affected... | लाळ, खुरकत लसीकरण केले का? दूध उत्पादनावर होईल परिणाम...

लाळ, खुरकत लसीकरण केले का? दूध उत्पादनावर होईल परिणाम...

उपाययोजनेला तोकडी यंत्रणा ठरतेय अडसर; पशूपालकांमध्ये चिंता

उपाययोजनेला तोकडी यंत्रणा ठरतेय अडसर; पशूपालकांमध्ये चिंता

शेअर :

Join us
Join usNext

परभणी जिल्ह्यात अनेक गावांमध्ये लम्पीनंतर आता जनावरांना लाळ, खुरकुत विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. परिणामी शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक गावात लसीकरण केले जात असले तरी शेतकरी, पशुपालकांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे.

मात्र, अंमलबजाणीसाठी पशुसंवर्धन विभागाकडे मनुष्यबळ तोकडे पडत असल्याने लसीकरण मोहिमेवर परिणाम होत आहे. तर दुसरीकडे पशुधनाला 'लाळ, खुरकत लसीकरण न केल्यास विषाणूजन्य रोगाचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे दूध उत्पादनावर देखील परिणाम होण्याची शक्यता आहे.

पशुसंवर्धन विभाग अलर्ट मोडवर

जिल्ह्यात ३ लाख ९८ हजार ३५६ गाय आणि म्हैसवर्गीय जनावरे आहेत तसेच शेळ्या, मेंढ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. गतवर्षी लम्पी रोगाच्या प्रादुर्भावामुळे अनेक जनावरे बाधित झाली होती. लसीकरण मोहिम राबविल्याने लम्पीवर नियंत्रण मिळविता आले. मात्र, तरीही अनेक गाय, बैल, वासरे ५०० पेक्षा अधिक दगावली. आता लाळ, खुरकुत रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने पशुसंवर्धन विभाग अलर्ट मोडवर आला असल्याची स्थिती आहे.

विषाणूजन्य रोगाचा संभाव्य धोका लक्षात घेता जिल्ह्यात लाळ खुरकत प्रतिबंध लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली. लसीकरणापासून 
एकही पशुधन वंचित राहणार नाही निर्देश देण्यात आले. मात्र, अनेक पशुवैद्यकीय दावाखान्यात कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या याला अडसर ठरत असून याकडे संबंधित विभागाने लक्ष देण्याची मागणी होत आहे. शेतकऱ्यांनीही आपल्या पशूधनाची काळजी घेणे गरजेचे आहे.

दूध उत्पादनात होते घट

■ या आजारात पशुधनास १०५ ते १०६ डिग्री ताप येतो. या आजाराने दुधाळ जनावरांच्या दूध उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होते. जनावरांच्या खुरामध्ये तसेच तोंडामध्ये जखमा होतात आणि त्यांचे खाणे-पिणे बंद होऊन रोगप्रतिकारशक्त्ती कमी होते.

■ शेळ्या, मेंढ्यांमधील 'पीपीआर' हा रोग देखील विषाणूजन्य असून या आजारात १०५ ते १०६ डिग्री ताप येतो. नाक आणि डोळ्यांतून सारखे पाणी वाहते. तोंडामध्ये जखमा होतात, श्वास घेण्यास त्रास होतो. जनावरांना अतिसाराची बाधा होऊन मृत्यू होऊ शकतो.

पशूपालकांमध्ये जनजागृतीची आवश्यकता

• पशुपालक, शेतकऱ्यांनी लाव्या, खुरकुत प्रतिबंधकतेसाठी जनावरांचे लसीकरण करून घ्यावे, यासाठी जिल्ह्यात लसिकरण मोहिम राबविली जात आहे.

• अनुषंगाने पशुसंवर्धन विभागाची तयारी सुरू आहे. पशुपालकांमध्ये जनजागृती करण्यात येत असल्याचे विभागाकडून सांगण्यात आले.

गुरांचे लसीकरण करा; लाळ खुरकत, पीपीआर प्रतिबंध करा!

जिल्ह्यातील जनावरांची संख्या

गाय १३७१५०

बैल १६२७११

म्हैस ९८४९५

लसीकरणाचे आवाहन

• रोगाची लागणसुद्धा एका जनावराकडून दुसऱ्या जनावराला होते. यावरही प्रतिबंधक लसीकरण हा प्रभावी उपाय आहे.

• जिल्ह्यातील पशुपालकांनी पशुधनास या रोगाची लागण होऊ नये यासाठी लसीकरण करू घ्यावे, असे आवाहन पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात आले आहे.

Web Title: Have you been vaccinated against lal khurkat? Milk production will be affected...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.