Join us
Daily Top 2Weekly Top 5

हिरवा चारा मुबलक पण कडब्याची आवक घटली; कडब्याला शेकडा काय मिळतोय दर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2026 16:13 IST

kadaba market कडब्याचे उत्पादन कमी झाल्यामुळे त्याचे दर वाढले तर हिरवा चारा मुबलक प्रमाणात असल्याने त्याचे दर कोसळले आहेत.

मोडनिंब: कडब्याचे उत्पादन कमी झाल्यामुळे त्याचे दर वाढले तर हिरवा चारा मुबलक प्रमाणात असल्याने त्याचे दर कोसळले आहेत.

हा हिरवा चारा घालवण्यासाठी काही शेतकऱ्यांनी सोशल मीडियावर जाहिरात चालवली आहे. पावसाळ्यातील चाऱ्यासाठी जनावरांना कडबा खरेदी करावा लागत आहे.

कडब्याचा दर २,८०० रुपये प्रति शेकडा विकला जात आहे. गतवर्षी दमदार पाऊस झाला. बरेच दिवस जमिनीमध्ये वापसा नव्हता. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी ज्वारी पेरणीकडे पाठ फिरवली.

मोडनिंब भागात अरण, जाधववाडी, बैरागवाडी, बावी, तुळशी, वरवडे, भेंड, होळे, उजनी या भागात शेतकऱ्यांनी ज्वारीपेक्षा ऊस, गहू, मका, यावर भर दिला. मात्र जनावरांना पावसाळ्यामध्ये कोरड्या चाऱ्याची आवश्यकता असते.

त्यामुळे पशुपालक कडबा घेऊन त्याची गंज लावून तो पावसाने भिजू नये म्हणून सुरक्षितपणे लावताहेत त्यामुळे पालेदार कडब्याचा दर प्रतिशेकडा २८०० रुपये पर्यंत गेला आहे.

शेतकरी कडबा खरेदीसाठी मोडनिंब आठवडा बाजारात येताहेत. सोलापूर जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांकडे कडबा मोठ्या प्रमाणात आहे तो विक्रीसाठी घेऊन आजूबाजूची शेतकरी येत आहेत. त्याला दरही चांगला मिळत आहे.

मकवान, कडवळची १८०० रुपयांनी गुंठा विक्री◼️ मकवान, कडवळ या हिरव्या चाऱ्याची आवक मोठ्या प्रमाणात असल्यामुळे १८०० रुपयाला प्रति गुंठा दोन हजार रुपयांपेक्षा जास्त विकला जाणारा हिरवा चारा अनेक शेतकऱ्यांच्या शेतात आहे.◼️ सोशल मीडियावरून मकवान विकणे आहे, अशी जाहिरात शेतकऱ्यांना करावी लागत आहे. तर ग्राहकच मिळत नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी मकाच करणे पसंत केले आहे.

अधिक वाचा: लाईट बिल अजून कमी होणार, आता मिळणार डिस्काउंट; कोणत्या युनिट स्लॅबला किती रुपये डिस्काउंट?

English
हिंदी सारांश
Web Title : Green fodder plentiful, but straw dwindles; what's the rate?

Web Summary : Straw prices rise due to low production, while green fodder rates plummet. Farmers advertise green fodder online. Straw fetches ₹2,800 per hundred. Farmers prefer sugarcane, wheat, and corn over sorghum due to past rain issues.
टॅग्स :शेतकरीशेतीदुग्धव्यवसायबाजारमार्केट यार्डसोलापूर