Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >डेअरी > Goat Farming शेळीपालन करताय: या आहेत शेळ्यांच्या टॉप पाच जाती

Goat Farming शेळीपालन करताय: या आहेत शेळ्यांच्या टॉप पाच जाती

Goat Farming: Here are the top five breeds of goats | Goat Farming शेळीपालन करताय: या आहेत शेळ्यांच्या टॉप पाच जाती

Goat Farming शेळीपालन करताय: या आहेत शेळ्यांच्या टॉप पाच जाती

शेळीपालन अतिशय उत्कृष्ट व्यवसाय असून आर्थिक दृष्ट्या फायद्याचा आहे. शेळीपालनाच्या व्यवसाय अत्यंत अल्प गुंतवणुकीत केला जाऊ शकतो. शेळीची रोगप्रतिकारक शक्ती उत्तम असल्यामुळे कोणत्याही वातावरणात तग धरण्याची क्षमता चांगली आहे. Goat Breed

शेळीपालन अतिशय उत्कृष्ट व्यवसाय असून आर्थिक दृष्ट्या फायद्याचा आहे. शेळीपालनाच्या व्यवसाय अत्यंत अल्प गुंतवणुकीत केला जाऊ शकतो. शेळीची रोगप्रतिकारक शक्ती उत्तम असल्यामुळे कोणत्याही वातावरणात तग धरण्याची क्षमता चांगली आहे. Goat Breed

शेअर :

Join us
Join usNext

शेळीपालन अतिशय उत्कृष्ट व्यवसाय असून आर्थिक दृष्ट्या फायद्याचा आहे. शेळीपालनाच्याव्यवसाय अत्यंत अल्प गुंतवणुकीत केला जाऊ शकतो. शेळीची रोगप्रतिकारक शक्ती उत्तम असल्यामुळे कोणत्याही वातावरणात तग धरण्याची क्षमता चांगली आहे.

आपल्या देशात एकूण सुमारे २० शेळ्यांच्या जाती असून त्यातील काही प्रमुख जाती खालीलप्रमाणे.
अ) देशी जाती
१) उस्मानाबादी

मुळस्थान महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्हा व त्याभोवतालचा मराठवाड्यातील भाग. उस्मानाबादी शेळ्या आकाराने मध्यम व भक्कम असतात, जनावरांचा रंग काळा असतो. तथापि काही जनावरांच्या कपाळावर व पोटावर पांढरे ठिपके आढळतात. चेहरेपट्टी बहिर्वक्र असून कान लोंबकळणारे असतात. पाय मजबूत असून खुर काळ्या रंगाचे आढळतात. शिंग असणारी व बिनशिंगी अशा दोन्ही प्रकारच्या उस्मानाबादी शेळ्या आढळतात. शिंगे पिळदार असून पाठीमागे वळलेली असतात. अंगावरील केस लांब किंवा आखूड दोन्ही प्रकरचे असून त्यावर एक प्रकारची मोरपंखी रंगाची छटा आढळते. पूर्ण वाढलेल्या बोकडाचे सरासरी वजन ५० ते ५५ किलो तर शेळीचे वजन ३० ते ३५ किलो असते. जनावरांची उंची ५० ते ७० से.मी. आढळते. प्रत्येक वेतातील करडांचे प्रमाण १६० टक्के असून या शेळ्यापासून दोन वर्षात तीन विते मिळतात. उस्मानाबादी शेळ्यापासून मिळणाऱ्या मटणाचे प्रमाण ५० टक्के इतके असते. बोकड मटणासाठी उपयुक्त असतात. 

२) संगमनेरी
संगमनेरी शेळ्या प्रामुख्याने पुणे, नगर आणि नाशिक जिल्ह्यात आढळतात. मध्यम आकाराची, पांढऱ्या रंगाची काही वेळा पिवळसर तपकिरी छटा असणारी संगमनेरी जातीची जनावरे दिसतात. कान लोंबकळणारे असतात, नर आणि मादी दोन्हीमध्ये शिंगे आढळतात, शिंगे पाठीमागे वळलेली व शेवटी उभी असणारी आढळतात.नराचे वजन ४५ किलो व मादीचे शरीर वजन ३५ किलो असते. संगमनेरी शेळ्या मांसासाठी व दुधासाठी शेळ्या दररोज सरासरी अर्धा ते एक किलो दुध देतात तर मांस उत्पादनाचे प्रमाण ४५ टक्के इतके आढळते. जुळ्यांचे प्रमाण ४५ ते ५० टक्के इतके आढळते. 

३) जमनापारी
जमनापारी शेळीचे मूळ स्थान उत्तरप्रदेशातील इटवाह जिल्ह्यातील असून या शेळ्या गंगा, यमुना, चंबळ या नद्याच्या खोऱ्यात तसेच मथुरा, आग्रा या भागात प्रामुख्याने आढळतात. जमनापारी शेळ्या उंच आणि भक्कम बांध्याच्या असतात. लोंबकळणारे लांब कान व रोमन आकाराचे नाक हे ठळकपणे नजरेत भरते. बहुतांशी शेळ्या पांढऱ्या रंगाच्या असून पिवळसर, तपकिरी रंग देखील आढळतो. काहीवेळा शरीर व चेहऱ्यावर तपकिरी रंगाचे ठिपके देखील असतात. नराचे सरासरी वजन ६० ते ९० किलो तर शेळीचे वजन ५० ते ६० किलो आढळते. नर जनावरांची उंची ९० ते १०० से.मी. तर मादीची उंची ७५ ते ८५ से.मी. आढळते. जमनापारी शेळ्या चांगल्या दुध देणाऱ्या म्हणून प्रसिद्द आहेत. दरवर्षी एक वेत मिळते. जुळ्यांचे प्रमाण दुर्मिळ नसते. सरासरी दुध उत्पादन दररोज दोन ते तीन किलो तर ३०५ दिवसात ६०० किलो दुधाची नोंद झाल्याची आढळते. हि जात मटणासाठी चांगली आहे. 

४) सुरती
सुरती शेळ्या गुजरात राज्याचा सुरत व महाराष्ट्र गुजरातच्या सीमावर्ती प्रदेशात म्हणजेच नाशिक, खानदेशात आढळतात. सुरती शेळ्या दुधाळ वर्गात मोडणाऱ्या असून टंचाईसदृश्य मोसमात देखील तग धरतात. आकाराने लहान असून रंगाने पांढरे असतात. नाकाचा आकार काहीसा बहिर्वक्र तर तोंड रुंद असते. कान मध्यम आकारचे आढळतात. शिंगे लहान, पसरट व मागे वळलेली असतात. बोकडांना दाढी असते. या शेळ्यामध्ये चरण्यासाठी इतर कारणासाठी दूर अंतरापर्यंत चालण्याची क्षमता आढळत नाही. सुरती शेळ्या चांगल्या दुध देणाऱ्या असून सातत्त्याने वेतामध्ये रोज एक ते दोन किलो दुध देतात. 

५) बारबरी
ब्रिटीश, सोमालिया प्रदेश्तील बारबेरा शहर हे या जातीचे उगम स्थान मानले जाते. सध्याच्या काळात आग्रा, मथुरा, अलीगड, दिल्ली आणि हरियाना राज्यातील कर्नाल व भोवतालच्या प्रदेशातील जात म्हणून बारबरी शेळ्या ओळखल्या जातात. शरीराचा आकार लहान व पाचरीसारखा असतो. पांढरा रंग व त्यावर काळे तपकिरी ठिपके संपूर्ण शरीरावर आढळतात. शेळ्यांचे कान आखूड असून शिंगे लहान व सुरवातीस उभी व नंतर पाठीमागे वळलेली असतात. जनावरांची त्वचा चमकदार असून हरणाप्रमाणे दिसतात. बारबरी शेळ्या दुधासाठी प्रसिद्ध असून रोज सरासरी एक ते दोन किलो दुध देतात. 

ब) विदेशी जाती
१) सानेन
सानेन जातीचे मूळ स्थान स्वित्झर्लंड मधील सानेन खोऱ्यातील असून संपूर्ण जगभर विशेषतः अमेरिका, रशिया आणि ऑस्ट्रेलिया या जातीची जनावरे आढळतात. सानेन शेळ्या आकाराने मोठ्या असून त्यांचा रंग पांढरा असतो. मान व पाय लांब व सडसडीत असतात. कास पूर्ण विकसित झालेली व सड लांब असतात. कानाचा आकार छोटा तर रचना उभी असते. सानेन शेळ्या बहुतांशी बिनशिंगी असतात. माद्या नरामध्ये काहीवेळा शिंगे आढळतात. सानेन शेळ्या उत्कृष्ट दुधाळ म्हणून ओळखल्या जातात. दैनंदिन दुध उत्पादन ५ किलोपर्यंत आढळते. 

२) अल्पाईन
स्वित्झर्लंड आणि फ्रान्स मधील अल्पाईन पर्वतीय प्रदेशात या शेळ्या आढळतात. मध्यम आकाराची दुधाल शेली म्हणून हि जात ओळखली जाते. शरीराच्या रंगामध्ये विविधता आढळून येते, काळा तपकिरी रंग प्रामुख्याने दिसून येतो. तथापि मळकट पांढरा रंगही आढळतो. चेहरा पसरट असून कान टवकारलेले असतात. नराचे वजन ६५ ते ८० किलो तर मादीचे वजन ५० ते ६० किलो असते. शेळ्या चांगल्या दुध देणाऱ्या असून रोज सरासरी २ ते ४ किलो दुध देतात.

स्वाती बबन खरमाटे
सावंगी चौक, गंगापूर रोड, लासूर स्टेशन, ता.गंगापूर

अधिक वाचा: Sheep Farming मेंढीपालन करताय, लोकर व मांसाचे अधिक उत्पादन देणाऱ्या जाती कोणत्या?

Web Title: Goat Farming: Here are the top five breeds of goats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.