बेल्हा : येथील बैल बाजार जिल्ह्यात सर्वत्र प्रसिद्ध असून आठवडे बैल बाजारात बैलांची आवक चांगली वाढली; मात्र बैलांचे भाव मात्र स्थिरच होते.
या बाजाराबरोबरच शेळी मेंढीचा बाजार, तरकारी बाजार तसेच कडधान्य बाजार मोठा भरतो. या ठिकाणी संगमनेर, नाशिक, लासलगांव, कल्याण, नांदेड, बीड, धाराशिव आदी जिल्ह्यातून व तालुक्यातून शेतकरी व व्यापारी बैल खरेदी विक्रीसाठी येतात.
या प्रसिद्ध असणाऱ्या बैल बाजारात गावठी, म्हैसुरी, खिल्लारी व पंढरपुरी बैल विक्रीसाठी येतात. या बैल बाजारात बैलांची आवक बऱ्यापैकी होती; मात्र बैलांचे भाव मात्र स्थिरच होते.
गेल्या काही दिवसांपासून या बैल बाजारात बैलांना थोडा फार जास्त भाव मिळत आहे. बैलांच्या शर्यती चालू आहेत असे अनेक व्यापारी व शेतकऱ्यांनी सांगितले. गावठी बैलांना जास्त मागणी होती.
बैल बाजारात खिल्लारी बैल जोडीचे भाव ६० ते ७० हजार रुपये तर गावठी बैलजोडीचे भाव ४० ते ५० हजार रुपये असे होते. कालच्या बैल बाजारात लाखो रुपयांची उलाढाल झाली.
बैलांची आवक ६०० एवढी झाली तर विक्री ४२८ एवढी झाली. तसेच म्हशी व रेडे २०६ आवक झाली तर विक्री १५९ झाली. तर शेळ्या मेंढ्यांची आवक २५१ झाली तर विक्री १२६ झाली.
खरेदी-विक्रीचे व्यवहार ओळखीवर, उसनवारीवर व इसार देऊन होतात. बैल बाजारातून महागडे बैल खरेदी करण्यापेक्षा ट्रॅक्टरच्या साहाय्याने शेतीची मशागत शेतकरी करून घेत आहेत.
शेतीची आजच्या बैल बाजारात बैलांचे व्यवहारही बऱ्यापैकी झाले असल्याची माहिती बाजार समितीचे कार्यालयीन प्रमुख शैलेश नायकवाडी यांनी दिली.
७० हजार रुपयांना खिल्लार बैलजोडीबैलांची आवक ६०० एवढी झाली तर विक्री ४२८ एवढी झाली. तसेच म्हशी व रेडे २०६ आवक झाली तर विक्री १५९ झाली. गावठी बैलांना जास्त मागणी होती.
शेतकरी बैल बाजारातून महागडे बैल खरेदी न करता ट्रॅक्टरच्या साहाय्याने शेती करून घेत आहे. शेतीची मशागत लवकर होत आहे. सध्या शेतकरी यांत्रिकीकरणावरच जास्त भर दिलेला आहे. - संतोष पिंगट, बेल्हा
सध्या जनावरे सांभाळणे शेतकरी वर्गाना अवघड झाले असून एका दिवसाचा बैलजोडीचा जनावराचा खर्च ७०० रुपयांच्या आसपास येतो. त्यामध्ये ओला चारा, सुका चारा व पशुखाद्य असा आहे. त्यातही महागाई जास्त वाढली आहे. - अविनाश मुळे, जामखेड
अधिक वाचा: कुक्कुटपालनात २५ माद्या आणि ३ नर कोंबड्या वाटप योजनेसाठी अर्ज प्रक्रिया सुरु; वाचा सविस्तर