Join us

Dudh Dar : राज्यातील 'या' दूध संघाने केली खरेदी दरात दोन रुपयांची वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2025 14:29 IST

Gokul Milk Kolhapur : दूध उत्पादक संघाने (गोकुळ) आज शनिवारपासून म्हैस दूध खरेदी घरात प्रति लिटर दोन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे ६.५ फॅट आणि ९.० एसएनएफ पासून पुढेही दरवाढ उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार आहे.

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने (गोकुळ) आज शनिवारपासून म्हैस दूध खरेदी घरात प्रति लिटर दोन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे ६.५ फॅट आणि ९.० एसएनएफ पासून पुढेही दरवाढ उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार आहे.

गोकुळचे सध्या म्हैस दूध संकलन नऊ लाख तीस हजार लिटर प्रतिदिन इतके आहे पण मुंबई पुण्यासह सर्वच ठिकाणी दुधाला मागणी वाढत आहे. म्हैस दुधाचे उत्पादन जास्त व्हावे यासाठी संघाकडून विविध प्रयत्न केले जात आहेत. म्हैस दूध उत्पादकांना प्रोत्साहन देण्यासाठी गोकुळच्या संचालक मंडळाने आजपासून खरेदी दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला.

त्यामुळे आता ६.५ फॅट व ९.० एसएनएफसाठी शेतकऱ्यांना प्रति लीटर ५४.८० रुपये दर मिळणार आहे. यामुळे कोल्हापूरसह जिल्ह्याबाहेरील दूध उत्पादकांना याचा फायदा होणार आहे. शुक्रवारी झालेल्या सत्कार समारंभात अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी या दरवाढीचे सुतोवाच केले होते.

अशी होणार वाढ

फॅटएसएनएफजुना दरनवीन दर
६.५९.०५२.८०५४.८०
७.०९.०५४.६०५६.६०

हेही वाचा : भारतातून कोणकोणत्या कृषी मालांची कुठे होतेय निर्यात? वाचा सविस्तर माहिती

टॅग्स :गोकुळदूधदुग्धव्यवसायशेतकरीशेतीशेती क्षेत्रकोल्हापूर